तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरले, आईसह दोन निष्पाप चिमुकल्यांना जिवंत जाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 06:11 IST2025-05-26T06:11:06+5:302025-05-26T06:11:06+5:30

घटनास्थळी मिळालेले पुरावे, सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक तपशील तपासण्यात येत आहेत. 

Triple murder case in Pune two innocent children along with their mother burnt alive | तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरले, आईसह दोन निष्पाप चिमुकल्यांना जिवंत जाळले

तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरले, आईसह दोन निष्पाप चिमुकल्यांना जिवंत जाळले

रांजणगाव गणपती : जिल्ह्यातील रांजणगाव खंडाळे (ता. शिरूर) परिसरात  आईसह दोन निष्पाप बालकांना पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

पोलिसांच्या  माहितीनुसार, रविवारी पुणे-अहिल्यानगर महामार्गालगत खंडाळा माथ्याजवळ रांजणगाव गावच्या हद्दीत एक महिला व तिच्या दोन लहान मुलांना अज्ञात इसमाने खून करून पेटवून दिले. या महिलेचे वय अंदाजे २५ वर्षे असून, लहान मुलांचे वय अंदाजे चार वर्षे व दीड वर्षे आहे. ग्रोवेल कंपनीच्या मागील बाजूस हे मृतदेह आढळले.

ओळख पटेना

हे हत्याकांड कोणी, कोणत्या कारणावरून केले, हे स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासणीत महिलेच्या उजव्या हातावर ‘जय भीम’ असे गोंदलेले असल्याचे पोलिसांना आढळले आहे. या तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनास्थळी मिळालेले पुरावे, सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक तपशील तपासण्यात येत आहेत. 
 

Web Title: Triple murder case in Pune two innocent children along with their mother burnt alive