शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

पुणे महापालिकेत आयुक्तांचा धमाका : विभागप्रमुखांच्या केल्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 10:38 PM

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त सुरेश जगताप यांच्यासह अन्य काही महत्वाच्या विभागप्रमुखांना त्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या विभागातून दुसरीकडे हलवण्यात आले आहे.

पुणे : महापालिका आयुक्त सौरव राव यांनी महापालिकेच्या विभागप्रमुखांच्याही बदल्या केल्या. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त सुरेश जगताप यांच्यासह अन्य काही महत्वाच्या विभागप्रमुखांना त्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या विभागातून दुसरीकडे हलवण्यात आले आहे. शुक्रवारी कार्यमुक्त होऊन लगेचच दुसऱ्या ठिकाणचा कार्यभार घेण्यास त्यांना बदलीच्या आदेशातच बजावण्यात आले आहे.

          घनकचरा व्यवस्थापन विभागाचे जगताप यांना आता उपायुक्त परीमंडळ क्रमांक ४ हे पद देण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर सहायक आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोळक यांच्याकडे स्थानिक संस्था कर व परिमंडळ क्रमांक ४ चा कार्यभार होता. स्थानिक संस्था कर कायम ठेवून परिमंडळ क्रमांक ४ हून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. तुषार दौंडकर यांच्याकडील आकाश चिन्ह विभागाचा अतिरिक्त कार्यभार विजय दहिभाते यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांच्याकडे परिमंडळ क्रमांक १ चा उपायुक्त म्हणून कार्यभार आहे. तो सांभाळून त्यांनी या पदाचा कार्यभार पहायचा आहे. त्यांच्याकडे पुर्वीही हा विभाग होता.

          दौंडकर यांच्याकडेच क्रिडा विभागाचाही अतिरिक्त कार्यभार होता. तो उपायुक्त किशोरी शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यांनीही आपल्या मुळ पदाचा कार्यभार सांभाळून हा नवा कार्यभार पहायचा आहे.  स्थापत्य विभागातील अधिक्षक अभियंता मदन आढारी यांच्याकडील प्रकल्प क्रमांक २ चा कार्यभार बदलून त्यांना मलनिसारण विभागाची देखभाल दुरस्ती सोपवण्यात आली आहे. या पदावर कार्यरत असलेले हेमंत देवधर यांना पाणी पुरवठा विभागात बदलण्यात आले आहे. पाणी पुरवठा विभागातील जगदीश खानोरे यांना तिथून बदलून प्रकल्प क्रमांक २ ची जबाबदारी देण्यात आली आहे. 

        काही विभागप्रमुखांबाबत पदाधिकाची तक्रार होती. कामांना विलंब लावणे, पदाधिकाऱ्याचे सांगणे टाळणे यामुळे त्यांच्याबाबत पदाधिकाऱ्यामध्ये नाराजी होती. बदल्यांवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. राव यांनी आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच विभागप्रमुखांसह कनिष्ठ अभियंत्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सर्वांना नव्या पदावर त्वरीत रूजू होण्याचा आदेश देण्यात आला असून राजकीय दबाव किंवा अन्य मार्गाने बदली टाळण्याचा प्रयत्न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याची तंबीही देण्यात आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSaurabh Raoसौरभ रावTransferबदली