कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:12 IST2021-03-21T04:12:17+5:302021-03-21T04:12:17+5:30

यावेळी सरपंच दिनेश लांडगे, कृषी अधिकारी गोविंद नाळे,कृषी पर्यवेक्षक जी.आर.ठाकूर, श्रीकांत राखुंडे,सहायक कृषी अधिकारी श्रीमती व्ही.एल.खडतरे यांच्यासह शेतकरी ...

Training to farmers on behalf of the Department of Agriculture | कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना प्रशिक्षण

कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना प्रशिक्षण

यावेळी सरपंच दिनेश लांडगे, कृषी अधिकारी गोविंद नाळे,कृषी पर्यवेक्षक जी.आर.ठाकूर, श्रीकांत राखुंडे,सहायक कृषी अधिकारी श्रीमती व्ही.एल.खडतरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना जमिनीची सुपीकता कशी वाढवावी माती परीक्षणा साठी मृदा नमुने कसे घ्यावे याबाबत व ठिबक तुषार सिंचन योजना पिकावर औषध फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गोपीनाथ मुंढे-शेतकरी अपघात योजना, मागेल त्याला शेततळे योजना, पीकविमा याचीही सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.

विकेल ते पिकेल, सूक्ष्म अन्नप्रक्रिया उदयोग, मर्ज फळबाग लागवड योजनेची माहिती उपस्थितीत शेतकऱ्यांना देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. एल. खडतरे यांनी केले तर सरपंच भरत लांडगे सरपंच यांनी शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करून आभार मानले.

--------------------------------------------------------

फोटो क्रमांक : २० आंबेठाण कृषी प्रशिक्षण

फोटो - वराळे येथे कृषी विभागाच्या वतीने शेती विषयक माहिती देताना.

Web Title: Training to farmers on behalf of the Department of Agriculture