शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

शहराची वाहतूक समस्या ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2016 02:15 IST

शहरात कोठेही वाहन पार्किंग करा किंवा रस्त्याच्या मधोमध वाहने उभे करून गप्पा मारा... रस्त्याच्या मधोमध हातगाडे उभे करून व्यवसाय करा... त्यासाठी वाहनचालकाला कितीही मनस्ताप झाला तरी फिकीर नाही.

बारामती : शहरात कोठेही वाहन पार्किंग करा किंवा रस्त्याच्या मधोमध वाहने उभे करून गप्पा मारा... रस्त्याच्या मधोमध हातगाडे उभे करून व्यवसाय करा... त्यासाठी वाहनचालकाला कितीही मनस्ताप झाला तरी फिकीर नाही... ही अवस्था आहे बारामती शहरातील अंतर्गत वाहतुकीची. काही दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या वाहतूक नियंत्रक समितीने शोधलेल्या उपायांना नगरपालिकेच्या उदासीनतेमुळे हरताळ फासला गेला आहे. प्रत्येक वेळी शहरातील वाहतूकसमस्येचा प्रश्न समोर आला की त्यावर शहर पोलीस ठाणे, नगरपालिका, व्यापारी यांच्या बैठका बसतात. चहा-पाणी होऊन निर्णय घेतले जातात. या निर्णयांची परिपत्रकेदेखील काढली जातात. मात्र, बैठकीवरून उठताच निर्णयांच्या परिपत्रकांना केराची टोपली दाखवली जाते. काही दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने शहरातील प्रमुख चौकांमधील वाहतूक व पार्किंगच्या समस्या मांडल्या होत्या. त्यावर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली गेली. या बैठकीत शहरांतर्गत वाहतूकसमस्येवर उपाय शोधण्यासाठी वाहतूक नियंत्रक समिती नेमली गेली. यानंतरही शहरातील वाहतूकसमस्या ‘जैसे थे’ आहे. शहरातील इंदापूर चौक, भिगवण चौक, पंचायत समिती चौक, गुणवडी चौक, छत्रपती शिवजीमहाराज रस्ता, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, उपजिल्हा रुग्णालयाचा परिसर, तीन हत्ती चौक आदी भागांध्ये वाहतूककोंडी नित्याची बाब ठरली आहे. सध्या शाळा सुरू झाल्या आहेत. सकाळी १० च्या दरम्यान व सायंकाळी ५ च्या दरम्यान शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठी गर्दी होते. शाळा परिसरात देखील गर्दीमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. शहरातील गुणवडी चौक, छत्रपती शिवाजीमहाराज रस्त्यावर फेरीवाले व्यवसाय करीत असतात. मागील आठवड्यात शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रस्त्याच्या मधे हातगाडे लावणाऱ्या फेरीवाल्यांना समज देण्यात आली होती. नगरपालिका या फेरीवाल्यांकडून कर पावत्यादेखील घेते. मात्र, अनेक वेळा नगरपालिकेच्या मासिक बैठकांमध्ये चर्चा होऊनदेखील हॉकर्स झोनच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला नाही.