राष्ट्रवादीच्या मेळाव्याला आलेल्या कार्यकर्त्यांवर वाहतूक पाेलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 20:53 IST2019-09-22T20:51:59+5:302019-09-22T20:53:28+5:30

राष्ट्रवादीच्या मेाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर लावलेल्या गाड्यांवर वाहतूक पाेलिसांनी कारवाई केली.

traffic police took action against illegal parking | राष्ट्रवादीच्या मेळाव्याला आलेल्या कार्यकर्त्यांवर वाहतूक पाेलिसांची कारवाई

राष्ट्रवादीच्या मेळाव्याला आलेल्या कार्यकर्त्यांवर वाहतूक पाेलिसांची कारवाई

धनकवडी : पद्ममावती येथील आण्णा भाऊ साठे रंगमंदिरात आज राष्ट्रवादीच्या मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी रस्त्यावर बेजबाबदार पद्धतीने वाहने लावण्यात आल्याने भारती विद्यापीठ वाहतूक पाेलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. यात पंधरा चारचाकी तर दहा दुचाकी वाहनांना जॅमर लावण्यात आले. त्यांच्याकडून सहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

पुणे सातारा रस्त्यावरील , पद्मावती येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे रंगमंदिरामध्ये रविवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीने कार्यकर्त्यांसाठी भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये मार्गदर्शक करण्यासाठी. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी सभागृहाबाहेर अस्तव्यस्त आणि बेजबाबदार पद्धतीने गाड्या पार्किंग केल्या होत्या. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. भारती विद्यापीठ वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय धुमाळ यांनी घटनास्थळी जाऊन बेजबाबदार पद्धतीने पार्किंग केलेल्या पंचवीस गाड्यांवर जँमर लावून धडक कारवाई केली.
 

Web Title: traffic police took action against illegal parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.