पवनानगर परिसरात वाहतूक कोंडी टाळण्याकरीता वाहतुकीत बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 15:04 IST2024-12-16T15:02:00+5:302024-12-16T15:04:12+5:30

३० डिसेंबर मध्यरात्रीपासून ते ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीत बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

Traffic changes to avoid traffic jams in the Pawananagar area | पवनानगर परिसरात वाहतूक कोंडी टाळण्याकरीता वाहतुकीत बदल

पवनानगर परिसरात वाहतूक कोंडी टाळण्याकरीता वाहतुकीत बदल

पवनानगर - पवनानगर परिसरात ३१ डिसेंबर आणि नववर्षारंभासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनामुळे होणारी वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ३० डिसेंबर मध्यरात्रीपासून ते ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीत बदल (Traffic Diversion) करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

पुणे-मुंबई-कामशेत बाजूकडून पवनानगर बाजारपेठेकडे येणारी हलकी चार चाकी वाहने बंद करुन ती येळसे ग्रामपंचयात फाटा येथून डावीकडे शिवली (विजय आडकर यांच्या घरापासून उजवीकडे कोथुर्णे बाजुकडे) कोथुर्णे-मळवंडी फाट्यापासून उजवीकडे ब्राम्हणोलीकडे- वारु फाट्यावरुन पुढे सरळ, ब्राम्हणोली फाटा मार्गे जवन रोडवरुन फांगणे, ठाकुरसाई, खडक गेव्हेंडे, जवण, चावसर, मोरवे, तुंग अशी वळविण्यात आली आहे. परंतु पवनानगर, कालेगाव, आंबेगाव, शिंदगाव, पाले, घामनधरा, दुधिवरे बाजूस जाणारी वाहने तसेच जड अवजड वाहने यांना सोडण्यात येईल.

येळसे ग्रामपंचायत फाटा पेधून डावीकडे-शिवली (विजय आडकर यांच्या घरापासून उजवीकडे कोथुर्णे बाजूकडे) कोथुर्णे गाव येथून डावीकडे-कोथुर्णे, मळवंडी फाट्यापासून उजवीकडे ब्राम्हणोलीकडे-वारु फाट्यावरुन पुढे सरळ ब्राम्हणोली एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे.

मौजे ब्राम्हणोली, वारु, कोथुर्णे, शिवली येथील स्थनिक रहिवाशी यांना येळसे बाजूकडे येण्यास बंदी (Traffic Diversion) करण्यात येत असून वारु फाटा-ब्राम्हणोली फाटा-पवना नदी पुल कालेगाव फाटा-पवना बाजारपेठ मार्गे वेळसे कामशेत या पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहेत.

३० डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ रोजी या कालावधीत पवनानगर बाजारात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून जड-अवजड वाहतूक ही पवनानगर बाजारपेठ येथे जाण्यास बंदी करण्यात येत आहे. त्याऐवजी जुने विश्रामगृह पवानानगर मार्गे केदारी खानावळ चौकातून सरळ पुढे सात नंबर कॉलनी-पत्राचाळ सचिवालय ग्रामपंचायत इमारत अशी बाह्यवळणमार्गे वळविण्यात येत आहे. पंरतु, ब्राम्हनोली, कालेगाव, दुधीवरे बाजूकडून येणारी जड -अवजड वाहतूक पवनानगर बाजारातून येळसे बाजूस सोडण्यात येतील.

१ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्री बारा पासून ते मध्यरात्री बारा पर्यंत या कालावधीत तुंग, गोरवे, चावसर, जवन, खडक गेव्हडे, ठाकूरसाई, फांगणे बाजुकडून पवनानगर, कामशेत बाजुकडे जाणारी वाहने ही काले कॉलनी पवनानगर बाजूकडे जाणेस बंदी आहे. त्याऐवजी ब्राम्हणोली फाटा उजवीकडे-वारु फाटा सरळ मळवंडी, कोथुर्णे फाट्यावरुन (Traffic Diversion) डावीकडे कोथुर्णेगाव उजवीकडे-शिवली (विजय आडकर यांच्या घरापासून डावीकडे येळसे बाजूकडे) येळसे ग्रामपंचायत फाटामार्गे मुंबई, पुणे, कामशेतकडे वळविण्यात येतील, पंरतु, पवनानगर, कालेगाव, आंबेगाव, शिंदगाव, दुधिवरे बाजूस जाणारी वाहने तसेच जड-अवजड वाहने यांना सोडण्यात येईल.

१ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्रीपासून ते मध्यरात्रीपर्यंत या कालावधीत ब्राम्हणोली फाटा उजवीकडे वारु फाटा सरळ-मळवंडी, कोथुर्णे फाट्यावरुन डावीकडे कोथुर्णे गाव उजवीकडे-शिवली (विजय आडकर यांच्या घरापासून डावीकडे येळसे बाजूकडे) येळसे ग्रामपंचायत फाटा अशी एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे. तसेच वारु व ब्राम्हणोली येथील स्थानिक रहिवाशी यांना पवना नदी पूल-कालेफाटा-पवना बाजारपेठ असे येण्यास बंदी करण्यात येत असून वारु फाटा-मळवंडी, कोथुर्णे फाट्यावरुन डावीकडे- कोथुर्णे गावातून पवनानगर बाजारपेठ या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Traffic changes to avoid traffic jams in the Pawananagar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.