‘चांगली दिसत नाहीस’ म्हणत केला छळ; चऱ्होलीत पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:20 IST2025-06-11T11:20:17+5:302025-06-11T11:20:57+5:30

‘दिसायला चांगली नाहीस’, असे सतत हिणवत तसेच तिचे दागिने गहाण ठेवत पतीने तिचा मानसिक छळ केला.

Tortured by saying You don't look good Married woman takes extreme step in Charholi, fed up with husband's harassment | ‘चांगली दिसत नाहीस’ म्हणत केला छळ; चऱ्होलीत पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

‘चांगली दिसत नाहीस’ म्हणत केला छळ; चऱ्होलीत पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

पिंपरी : वैष्णवी हगवणे या विवाहितेने सासरकडील मंडळींच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच चऱ्होली येथे पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘दिसायला चांगली नाहीस’, असे सतत हिणवत तसेच तिचे दागिने गहाण ठेवत पतीने तिचा मानसिक छळ करीत तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. ही घटना ३ जून रोजी दुपारी चऱ्होली येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजाता नरसिंग माने (वय ३२, रा. तनिष पर्ल, चऱ्होली) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. सुजाता यांचे वडील शिवाजी संपतराव सूर्यवंशी (रा. थेरगाव) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती नरसिंग वामनराव माने (वय ३३) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुजाता आणि आरोपी नरसिंग यांचा २५ जून २०१९ रोजी विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर नरसिंग याने सुजाता दिसायला चांगली नाही, असे म्हणून सतत हिणवत त्यांचा मानसिक छळ केला. वेळोवेळी भांडण करून शिवीगाळ व दमदाटी केली. माहेराहून पैसे आणण्यासाठी दबाव टाकला. फ्लॅटसाठी तसेच आर्थिक अडचणी असल्याचे सांगून सुजाता यांचे दागिने नरसिंग याने गहाण ठेवले. त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. अखेर या छळाला कंटाळून सुजाता यांनी ३ जून रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

Web Title: Tortured by saying You don't look good Married woman takes extreme step in Charholi, fed up with husband's harassment