Pune Crime: जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले; Video व्हायरल करण्याची धमकी देत केले वारंवार अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 19:17 IST2021-12-23T19:08:02+5:302021-12-23T19:17:11+5:30
शारीरिक संबंधाला विरोध केला तर व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी आरोपीने महिलेला दिली

Pune Crime: जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले; Video व्हायरल करण्याची धमकी देत केले वारंवार अत्याचार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने शहरात महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच या सर्व प्रकाराचा व्हिडीओही त्याने काढला. शारीरिक संबंधाला विरोध केला तर व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी आरोपीने महिलेला दिली. तसेच नेकलेस, मंगळसूत्र घेऊन महिलेला मारहाण केली.
हा प्रकार जुलै ते २२ डिसेंबर या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने बुधवारी (दि. २२) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राजेंद्र भांगले (रा. पाषाण, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक माहितीनुसार, भांगले याने महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून त्याचा व्हिडीओ काढला. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच महिलेचे दागिने तिच्या संमतीशिवाय घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.