शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धावायलाही धाप! देशातील प्रत्येकी ३ पैकी फक्त एकच विद्यार्थी तंदुरुस्त, शारीरिक आरोग्य सध्या गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 11:42 IST

देशातील सुमारे दोन तृतीयांश विद्यार्थी सातत्याने धावणे, उड्या मारणे किंवा हृदय-श्वसन क्षमता वाढवणारे व्यायाम करू शकत नाहीत

पुणे: देशातील शालेय विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीचे चित्र सध्या गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्येक तीन विद्यार्थ्यांपैकी फक्त एकच विद्यार्थी धाप न लागता धावू शकतो, असा निष्कर्ष वार्षिक आरोग्य सर्वेक्षणातून समोर आला आहे. कोव्हीडनंतर काही प्रमाणात सुधारणा दिसत असली तरी विद्यार्थ्यांच्या आरोग्यातील मूलभूत उणिवा अजूनही कायम असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

स्पोर्ट्स व्हिलेज एज्यु. स्पोर्ट्स संस्थेने केलेल्या १४व्या वार्षिक सर्वेक्षणात देशातील ११२ शहरांतील ३३३ शाळांमधील १ लाख ४१ हजार ८४० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. २०१० पासून सुरू असलेला हा अभ्यास शालेय विद्यार्थ्यांच्या तंदुरुस्तीवर आधारित सर्वांत व्यापक उपक्रमांपैकी एक मानला जातो. विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता सात निकषांवर तपासण्यात आली. यात बीएमआय, एरोबिक आणि अनएरोबिक क्षमता, अपर व लोअर बॉडी स्ट्रेंथ, कोर स्ट्रेंथ आणि लवचीकता यांचा समावेश होता.

अहवालानुसार, देशातील सुमारे दोन तृतीयांश विद्यार्थी सातत्याने धावणे, उड्या मारणे किंवा हृदय-श्वसन क्षमता वाढवणारे व्यायाम करू शकत नाहीत. एरोबिक फिटनेस कमी असल्यास भविष्यात हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.बीएमआयच्या बाबतीतही स्थिती चिंताजनक आहे. सुमारे ४० टक्के विद्यार्थी निरोगी श्रेणीबाहेर आहेत. २०२३ मध्ये ५९.१ टक्के विद्यार्थी निरोगी श्रेणीत होते, तर २०२५ मध्ये हे प्रमाण ५९.६ टक्क्यांवर स्थिरावले आहे. म्हणजेच कोविडनंतरच्या काळात फारशी सकारात्मक झेप दिसत नाही. तसेच ४९ टक्के विद्यार्थी अपर बॉडी स्ट्रेंथमध्ये कमी पडत असून, ४४ टक्के विद्यार्थी लोअर बॉडी स्ट्रेंथच्या निकषांपर्यंत पोहोचत नाहीत. वाढलेला स्क्रीन टाइम, ऑनलाईन गेमिंग आणि अभ्यासाबरोबर वाढलेली बसून राहण्याची सवय यामुळे मुलांचे मैदानापासून दूर जाणे हा या स्थितीमागील प्रमुख घटक असल्याचे निरीक्षण आहे.

संस्थेचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सौमिल मुजुमदार यांनी सांगितले, ‘निरोगी जीवनशैलीची पायाभरणी बालवयातच होते. शाळांमधील क्रीडा तास पुरेसे नाहीत, पालक आणि समाजानेही मुलांना सक्रिय राहण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. नियमित मूल्यमापन आणि सामूहिक कृतीशिवाय परिस्थितीत अपेक्षित बदल घडणार नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Poor fitness: Most Indian students struggle with basic physical activities.

Web Summary : A survey reveals alarming fitness levels among Indian students. Only one in three can run without getting breathless. Aerobic fitness is low, raising risks of future health issues. Increased screen time and sedentary habits are major contributing factors.
टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलStudentविद्यार्थीEducationशिक्षणWomenमहिला