शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री शिंदे प्रचारासाठी पुण्यातच; MPSC च्या विद्यार्थ्यांसह शरद पवारांसोबतची आजची बैठक रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 11:37 IST

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आज शरद पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात भेट घेणार होतं.

एमपीएससीने (MPSC) नवीन पॅटर्ननुसार वर्णनात्मक पध्दत २०२५ पासून लागू करावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी सोमवारपासून सुरू असलेले आंदोलन आजही म्हणजेच सलग चौथ्या दिवशीही सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडवून आणतो, असं आश्वासन दिलं होतं. त्याप्रमाणे आज आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची एकनाथ शिंदेंसोबत भेट होणार होती. मात्र ही आजची भेट रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आज शरद पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात भेट घेणार होतं. मागील चार दिवसांपासून पुण्यात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर यातून तोडगा निघेल अशी अपेक्षा होती. मात्र ही बैठक अचानक रद्द करण्यात आली.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईला न जाता कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी आज दिवसभर पुण्यातच थांबणार असल्यान ही बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मुख्यमंत्री दोन दिवस पुण्यात आहेत, मात्र तरीही ते विद्यार्थ्यांना भेटायला येत नाही, अशी चर्चाही आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुरु आहे.  

आंदाेलनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आंदाेलनस्थळी भेट दिली आणि आंदाेलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हा प्रश्न सुटू शकताे असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना देत मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांसाेबत बैठक घेऊ आणि चर्चा करू असे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतरही आंदाेलन सुरूच ठेवत जाेपर्यंत एमपीएससी नाेटिफिकेशन काढत नाही ताेपर्यंत उपाेषणावर ठाम असल्याचे आंदाेलक विद्यार्थ्यांनी सांगितले.

आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय?

एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा. नव्या पद्धतीच्या अभ्यासासाठी किमान ५ ते ६ महिने वेळ मिळावा. आयोगानं घाईघाईनं नवी पद्धती अमलात आणू नये.तसेच नवा अभ्यासक्रम यूपीएससीच्या अभ्यासक्रमावर आधारित असल्यानं पुस्तकं उपलब्ध नाहीत. म्हणून ती उपलब्धता करुन द्यावी, अशा प्रमुख ४ मागण्या आंदोलकांच्या आहेत. आंदोलकांचा नव्या पद्धतीला विरोध नसून त्याच्या तातडीच्या अंमलबजावणीला आहे. साधारणपणे दर १० वर्षांनी परीक्षा पद्धतीत बदल होतो. याआधी २०१४पर्यंत एमपीएससीची परीक्षा ही वर्णनात्मक पद्धतीनंच होत होती. २०१४ ते २०२३ पर्यंत तीचं स्वरुप पर्यायवाचक झालं. आणि आता २०२३ मध्ये पुन्हा परीक्षेचं स्वरुप सविस्तर लेखी पद्धतीनं नियोजीत आहे.

विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणार- उपमुख्यमंत्री

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये निराशा तयार होत आहे. त्यामुळे थोडासा वेळ दिला पाहिजे. कोणाचाही विरोध नवीन पॅटर्नला नाही. २०२५ पासून लागू करा हीच मागणी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा त्यांना सांगितले असून तुमचा निर्णय रीकन्सिडर करा. यासंदर्भात राज्य सरकार सातत्याने पाठपुरावा करत असून. त्यांनी जर री कन्सिडर केला नाही तर राज्य सरकारला न्यायालयात जाण्याचा विचार करावा लागेल. आम्हाला शेवटी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहावे लागेल. त्यांना निराश करून चालणार नाही ते उद्याचं भविष्य आहेत. त्यासाठी जे जे लागेल ते करू माझी फक्त एक विनंती आहे कोणीही यात राजकारण आणू नये. विद्यार्थी हिताचे निर्णय सर्वांना घ्यावे लागतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSharad Pawarशरद पवारMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPuneपुणे