शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

स्त्रीशक्तीचा आजपासून जागर

By admin | Updated: October 13, 2015 01:30 IST

नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा उत्सव म्हणजे ‘नवरात्र’. घटामध्ये नंदादीप प्रज्वलित करून ब्रह्मांडातील आदिशक्ती-आदिमायेची मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना

पुणे : नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा उत्सव म्हणजे ‘नवरात्र’. घटामध्ये नंदादीप प्रज्वलित करून ब्रह्मांडातील आदिशक्ती-आदिमायेची मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना. उद्या (मंगळवार)पासून शहरात नवरात्रोत्सवाला मोठ्या दिमाखात प्रारंभ होत असून, भवानी माता, चतु:शृंगी, महालक्ष्मी मंदिर, तांबडी जोगेश्वरी आदी मंदिरे रंगरंगोटी, फुलांची आरास, लायटिंगच्या माळा या माध्यमातून सज्ज झाली आहेत.नवरात्रातील ९ दिवसांच्या माध्यमातून दुर्गादेवी तेज तत्त्वाच्या आधारे आपल्या ९ प्रमुख शस्त्रांसहित ब्रह्मांडात विहार करते. हे ९ दिवस ब्रह्मांडात वाईट शक्तींनी प्रक्षेपित केलेल्या त्रासदायक लहरी तसेच आदिशक्तीच्या मारकरूपी चैतन्यमय लहरी यांचे युद्ध सुरू असते. या वेळी ब्रह्मांडातील वातावरण तप्त झालेले असते व श्री दुर्गादेवीच्या शस्त्रांतून तेजाची झळाळी अतिवेगाने सूक्ष्मशक्तींवर हल्ला करीत असते. याचे प्रतीक म्हणून घट व त्यातील नंदादीप यांना पुजले जाते. यासाठी घरोघरी आणि मंदिरांमध्ये घटस्थापना करण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. या ९ दिवसांमध्ये उपवास करण्याचीदेखील प्रथा आहे. नवरात्रामध्ये देवीच्या ९ रसांमधील ९ रूपांचे दर्शन भाविकांना घडते. त्यांना अनुसरून देवीला साड्या परिधान केल्या जातात.