आज केवळ कोव्हॅक्सिन लस उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:11 IST2021-09-24T04:11:39+5:302021-09-24T04:11:39+5:30

पुणे : शासनाकडून नव्याने कोविशिल्ड लसीचे डोस प्राप्त न झाल्याने आज शहरात महापालिकेच्या कुठल्याही केंद्रांवर कोविशिल्ड लस मिळणार नाही. ...

Today only the covacin vaccine is available | आज केवळ कोव्हॅक्सिन लस उपलब्ध

आज केवळ कोव्हॅक्सिन लस उपलब्ध

पुणे : शासनाकडून नव्याने कोविशिल्ड लसीचे डोस प्राप्त न झाल्याने आज शहरात महापालिकेच्या कुठल्याही केंद्रांवर कोविशिल्ड लस मिळणार नाही.

मात्र, ससूनसह महापालिकेच्या ११ दवाखान्यांत प्रत्येकी १५० कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.

या उपलब्ध लसीच्या साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १० टक्के लस ही ऑनलाईन बुकिंगद्वारे, तर १० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. तर लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ४० टक्के लस ही २८ दिवस पूर्ण झालेल्यांना (२७ ऑगस्टपूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाईन बुकिंगद्वारे, तर ४० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे. लसीकरणाच्या ऑनलाईन बुकिंग करिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.

--------------------

Web Title: Today only the covacin vaccine is available