शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आज अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होणार

By admin | Updated: June 14, 2017 03:59 IST

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रियेचा भाग १ व भाग २ भरणे व त्यापुढील प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक दि. १४ जून, बुधवारी (आज) जाहीर केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रियेचा भाग १ व भाग २ भरणे व त्यापुढील प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक दि. १४ जून, बुधवारी (आज) जाहीर केले जाणार आहे. या प्रक्रियेची विद्यार्थी व पालकांना माहिती देण्यासाठी टाटा अ‍ॅसेंबली हॉल, वाडिया कॉलेज (रूबी हॉल शेजारी), राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल (सहकारनगर), कलमाडी हायस्कूल (कर्वे रोड) येथे मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.राज्य मंडळाचा (एसएससी) दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेला वेग आहे. केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीमार्फत उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशाची प्रक्रिया राबविली जात आहे. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत प्रवेश क्षमतेत वाढ झाली असून, एकूण २६७ महाविद्यालयांची एकूण ९४ हजार ५८० प्रवेश क्षमता आहे. अकरावी प्रवेश अर्जाचा भाग पहिला भरण्यास दि. २५ मे ०१७ पासून सुरूवात झाली. आतापर्यंत ७१ हजार १९४ विद्यार्थ्यांचे अर्ज आॅनलाइन भरले गेले आहेत, त्यापैकी २७ हजार ३९८ अर्जांची पडताळणी करण्यात आलेली आहे. पडताळणी न झालेल्या अर्जांची संख्या १६ हजार ४६८ इतकी आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक बुधवारी जाहीर केले जाणार असल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी दिली. अकरावी प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यासाठी विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी ११ ते १२ या वेळेमध्ये वाडिया कॉलेजच्या टाटा हॉलमध्ये मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर त्याच दिवशी दुसरा मार्गदर्शन वर्ग सहकार नगर येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये दुपारी १ ते २ या वेळेत पार पडणार आहे. तिसरा मार्गदर्शन वर्ग कर्वे रोड येथील कलमाडी हायस्कूलमध्ये दुपारी ३ ते ४ या वेळेत पार पडणार आहे. प्रवेशप्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून माहितीपुस्तिका विकत घ्यावी लागणार आहे. आजपासून उद्बोधन वर्गकॅम्प/येरवडा : वाडिया कॉलेज१४ जून सकाळी ११ ते १२पर्वती/धनकवडी : राजीव गांधी स्कूल १४ जून दुपारी १ ते २कोथरूड : कलमाडी हायस्कूल१४ जून दुपारी ३ ते ४