शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

जिरायती भागाला निरा - कऱ्हा उपसा योजना राबवणार; तालुक्यातील ३३ गावांना होणार लाभ - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 12:25 IST

जनाईसाठी २५३ कोटी तर शिरसाईसाठी १७६ कोटी पुरंदरसाठी ५६ कोटीची तरतुद तर कऱ्हा नदीवरील बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ११० कोटी निधीची तरतुद करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले

सुपे : बारामती तालुक्यातील ३३ गावांचा जिरायती शिक्का कायमचा घालवण्यासाठी १ हजार २५ कोटी खर्चाची  नीरा - कऱ्हा उपसा जलसिंचन योजना राबवणार असुन यामुळे ४५ हजार एकर क्षेत्राला याचा फायदा होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.  बोरकरवाडी ( ता. बारामती ) येथील तलावापर्यंत टीसीएस फाऊंडेशनच्यावतीने सीएसआर फंडातुन सुमारे २ कोटी ८८ लाख खर्चाच्या बंदिस्त पाईप लाईनच्या कामाचे भुमिपुजन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी येथील विठ्ठल मंदीरातील सभामंडपात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

 पवार पुढे म्हणाले की, जनाई, शिरसाई आणि पुरंधर या उपसा योजनेमुळे तालुक्यातील बराचसा भाग ओलीताखाली आला आहे. मात्र राहिलेल्या मोरगाव, बाबुर्डी, शेरेचीवाडी, काऱ्हाटी, जळगाव क. प. आणि अंजनगाव या नदी काठचा भाग तसेच चौधरवाडी वाकी पासुन ढाकाळे, भिलारवाडी पर्यंतची गावे या नीरा - कऱ्हा नदी जोड प्रकल्पांतर्गत ओलीताखाली येणार आहे. यावर्षी वीर धरण दोनदा भरेल ऐवढे पाणी नदीद्वारे वाहुन गेले आहे. हेच वाहुन जाणारे पाणी तेलंगणाच्या धर्तीवर मोठे वीज पंप टाकुन सात फुटी पाईप लाईनद्वारे दोन टप्यात पाणी उचलणार आहे. त्यामुळे जिरायती भागाला पाणी मिळाल्यास शेती ओलीताखाली येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील जिरायती असणाऱ्या ३३ गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या भागावर पुर्वीपासुन असलेला जिरायती शिक्का पुसण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे या भागाची आर्थिक सुबत्ता वाढुन राहणीमानही उंचवण्यास मदत होईल. याबाबत मंत्रिमंडळात लवकर मंजुरी घेत असल्याचे पवार यांनी सांगितले.           जनाईच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची बंद पाईप लाईनद्वारे तलावात पाणी सोडण्याची मागणी होती. त्यानुसार बोरकरवाडी तलावापर्यंत बंद पाईप लाईन करण्यात येणार आहे. यासाठी सीएसआर फंडातुन सुमारे २ कोटी ८८ लाख खर्चाच्या कामाचे भुमिपुजन केले. ही पाईप लाईन ३ फुट व्यासाची असुन शेतकऱ्यांच्या शेतातुन जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अडथळा न आणता सहकार्य करावे. त्यामुळे टेलपर्यंत पाणी जाईल असे पवार यांनी सांगितले. तसेच दंडवाडी, खोपवाडी या गावांचा अपवाद वगळता बंद पाईप लाईनला कुणाचा विरोध नाही. या दुरुस्तीसाठी जनाईसाठी २५३ कोटी तर शिरसाईसाठी १७६ कोटी मिळुन सुमारे ४२९ कोटी आणि पुरंदरसाठी ५६ कोटीची तरतुद करण्यात आली आहे. तर कऱ्हा नदीवरील बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ११० कोटी निधीची तरतुद करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांना कांद्यातुन दोन पैसे मिळतात, त्यामुळे कांद्याची निर्यात बंदी करु नका असेही केंद्रस्तरावर बोलणे झाल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारBaramatiबारामतीSocialसामाजिकPurandarपुरंदरFarmerशेतकरी