प्रेयसी सोबत एकत्र राहता यावे म्हणून पत्नीवर चाकूने वार; आळंदीतील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 21:10 IST2023-04-27T21:08:55+5:302023-04-27T21:10:15+5:30

आरोपी पती व त्याच्या प्रियसीवर गुन्हा दाखल

To be able to live together with a lover stabbing a wife Shocking type in Alandi | प्रेयसी सोबत एकत्र राहता यावे म्हणून पत्नीवर चाकूने वार; आळंदीतील धक्कादायक प्रकार

प्रेयसी सोबत एकत्र राहता यावे म्हणून पत्नीवर चाकूने वार; आळंदीतील धक्कादायक प्रकार

आळंदी : प्रेयसी सोबत एकत्र राहता यावे यासाठी पती व त्याच्या प्रेयसीने जिवे मारण्याच्या उद्देशाने मिळून पत्नीचे पाय दोरीने बांधून तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. चिंबळी (ता.खेड) येथे मंगळवारी (दि.२५) दुपारी हा धक्कादायक प्रकार घडला. याबाबत पीडित महिलेने आंळदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी पती व त्याच्या प्रियसीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीला व त्याच्या प्रेयसीला घरात एकत्र रहायचे होते. यासाठी आपण हिला मारून टाकल्याशिवाय आपल्या दोघाना एकत्र राहता येणार नाही म्हणत आरोपींनी फिर्यादीचे पाय दोरीने बांधले व आरोपी महिलेने फिर्यादीचे हात पकडून पतीने तिच्या गळ्यावर चाकुने वार केले. यावरून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: To be able to live together with a lover stabbing a wife Shocking type in Alandi