शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या गटनेत्यांनी उपमहापौरांवर उगारली कुंडी

By admin | Updated: August 25, 2015 04:59 IST

विद्यार्थ्यांकडून पीएमपीच्या पासचा विषय अनुमोदन न मिळाल्याने कामकाजातून वगळण्यात आल्यानंतर ‘त्यावर बोलू द्यावे, मतदान घ्यावे’ अशी मागणी करीत शिवसेनेचे गटनेते

पुणे : विद्यार्थ्यांकडून पीएमपीच्या पासचा विषय अनुमोदन न मिळाल्याने कामकाजातून वगळण्यात आल्यानंतर ‘त्यावर बोलू द्यावे, मतदान घ्यावे’ अशी मागणी करीत शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांनी डायसवर बसलेले उपमहापौर आबा बागुल यांच्यासमोर ठेवलेली कुंडी उचलून त्यांच्यावर उगारली तसेच राजदंड उचलून हातात घेतला. अचानक घडलेल्या या प्रकाराने सगळे सभागृह अवाक झाले. सभागृहातील ज्येष्ठ नगरसेवकांनी लगेच धाव घेऊन हरणावळ यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला.महापालिकेच्या मुख्य सभेत सभासदांच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी वर्गीकरणाचे प्रस्ताव ठेवण्यात आले होते. सभागृहाचे कामकाज सुरू होताच शिवसेनेच्या नगरसेवकांना बजेटमध्ये योग्य वाटा मिळाला नाही, असा आरोप करीत अशोक हरणावळ यांनी आपल्या पक्षाच्या नगरसेवकांसह महापौरांच्या समोरील मोकळया जागेत ठिय्या दिला. विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे व इतर सभासदांनी त्यांची समजूत काढून जागेवर बसण्याची विनंती केली.वर्गीकरणाचे काही प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांकडून पीएमपीच्या पाससाठी २५ टक्के रक्कम न घेता त्यांना मोफत देण्यात यावा, हा शिवसेनेच्या नगरसेवकांनी दिलेला प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला. या वेळी सभागृहातील कोणीही या प्रस्तावाला अनुमोदन दिले नाही. हरणावळ यांनी अरविंद शिंदे यांच्याकडे धाव घेऊन याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यास सुरुवात केली. मात्र, प्रस्तावाला कुणाचेही अनुमोदन न मिळाल्याने हा प्रस्ताव वगळण्यात आल्याचे नगरसचिव सुनील पारखी यांनी घोषित केले, त्या वेळी हरणावळ यांचा पारा चढला. ‘या प्रस्तावावर चर्चा झाली पाहिजे, त्यावर मतदान घ्या,’ अशी जोरजोरात मागणी करण्यास त्यांनी सुरूवात केली. मात्र, नियमानुसार तसे करता येत नसल्याचे पारखी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हरणावळ यांचा तोल सुटला त्यांनी डायसवर धाव घेऊन पारखी यांच्यासमोरील कागद भिरकावून दिले. त्यानंतर महापौरांच्या खुर्चीत बसलेले उपमहापौर आबा बागुल यांच्याकडे मोर्चा वळवला. त्यांच्यासमोरील राजदंड उचलून घेतला, तसेच कुंडी उचलून त्यांच्यावर उगारली. अखेर शिवसेनेच्या सदस्यांचा या प्रस्तावावर निषेध नोंदवून घेऊन या विषयावर पडदा टाकण्यात आला. (प्रतिनिधी)