थरारक शोधमोहीम..! कॉन कॉल, सूचना अन् मार्गदर्शन, संपूर्ण ऑपरेशनवर पुणे पोलिस आयुक्तांचे विशेष लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 11:35 IST2025-02-28T11:33:46+5:302025-02-28T11:35:14+5:30

शेतात पोलिसांना काही संशयास्पद हालचाल जाणवली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले,

Thrilling search operation..! Con calls, instructions and guidance, Pune Police Commissioner's special attention on the entire operation | थरारक शोधमोहीम..! कॉन कॉल, सूचना अन् मार्गदर्शन, संपूर्ण ऑपरेशनवर पुणे पोलिस आयुक्तांचे विशेष लक्ष

थरारक शोधमोहीम..! कॉन कॉल, सूचना अन् मार्गदर्शन, संपूर्ण ऑपरेशनवर पुणे पोलिस आयुक्तांचे विशेष लक्ष

- किरण शिंदे

पुणे -
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला स्वारगेट पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. तीन दिवसांपासून आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध पोलीस घेत होते. मात्र तो पोलिसांना चकवा देत होता. दत्तात्रय गाडे गुनाट गावातच लपला असल्याची खात्री पटल्यानंतर आणि पोलिसांनी या गावात मोठा पोलिस फौजफाटा बोलावला. जणू संपूर्ण गावाला पोलिसांनी वेढा घातला. कारण अंधार पडण्याच्या आता पोलिसांना त्याला पकडायचं होतं.

मात्र सायंकाळ झाली तरी आरोपीचा शोध लागत नव्हता. अंधार झाल्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन थांबवण्याचे ठरवले. यानंतर पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय गाडे गावालगत असणाऱ्या शेतात पोलिसांना काही संशयास्पद हालचाल जाणवली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, असता तो दत्तात्रय गाडे असल्याचे निष्पन्न झाले.



दरम्यान, आरोपीला पकडण्यासाठी स्वतः पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार संपूर्ण ऑपरेशनवर लक्ष ठेऊन होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार रात्री उशिरा पर्यंत संपूर्ण "सर्च ऑपरेशन" ची माहिती शिरूरमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांकडून घेत होते. ते पोलिसांना या संबंधित काही सूचना सुद्धा देत होते. दुपारी शिरूरमध्ये दाखल झालेल्या सह आयुक्त रंजन कुमार यांच्याकडून तसेच इतर अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी माहिती घेण्याचे काम अत्यंत गुप्ततेने रात्री ९ पर्यंत सुरू होते. त्यानंतर आयुक्त अमितेश कुमार घरी गेल्यानंतर सुद्धा सगळ्या अधिकाऱ्यांशी "कॉन कॉल" वरून सूचना आणि मार्गदर्शन करत होते. रात्री २.१५ वाजता आरोपीला गाडे याला शिरूर मधून पुण्यात आणले गेले.

Web Title: Thrilling search operation..! Con calls, instructions and guidance, Pune Police Commissioner's special attention on the entire operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.