पुण्यातील थरारक घटना! ३ तरुणांकडून एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 11:38 IST2025-06-20T11:37:05+5:302025-06-20T11:38:11+5:30

बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास 3 तरुणांनी कोयत्याने एकाला अडवून त्याच्यावर वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला

Thrilling incident in Pune! 3 youths fatally attack one with a scythe, incident captured on CCTV | पुण्यातील थरारक घटना! ३ तरुणांकडून एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

पुण्यातील थरारक घटना! ३ तरुणांकडून एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

किरण शिंदे 

पुणे : पुण्यात दिवसाढवळ्या आणि भररस्त्यात हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. पोलिसांची काहीच भीती नसल्याचे अशा घटनांमधून दिसून येत आहे. कोयता घेऊन थेट हल्ला होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात भररस्त्यात एक थरारक घटना घडली आली आहे. टोळक्याकडून रस्त्यावरून जात असलेल्या एकावर कोयत्याने हल्ला केल्याचे समोर आले आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मात्र हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.  नरेश रामचंद्र तिडंगे असे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांना २ जणांना याप्रकरणी अटक केली आहे. 

नरेश रामचंद्र तिडंगे (वय ४०) हे धानोरी रोड विश्रांतवाडी परिसरात काम करतात. बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास 3 तरुणांनी कोयत्याने त्यांना अडवून त्यांच्यावर वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्या या तरुणांनी तिथून पळ काढला. मात्र या हल्ल्यात नरेश जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे. हे दोघे ही जणं विश्रांतवाडी परिसरातील असुन त्यांचा साथीदार फरार आहे. पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे. 

Web Title: Thrilling incident in Pune! 3 youths fatally attack one with a scythe, incident captured on CCTV