थरारक..! पूर्व वैमनस्यातून १५ जणांच्या टोळीचा एकावर गोळीबार व कोयत्याने हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 02:25 PM2019-05-28T14:25:20+5:302019-05-28T14:56:08+5:30

 पूर्ववैमनस्यातून दहा ते पंधरा जणांच्या सराईत टोळक्यांनी एका सराईत गुंडावर गोळीबार करुन कोयत्याने वार केले.

Thrilling ..! A group of 15 people were attacked by firing and weapon on person | थरारक..! पूर्व वैमनस्यातून १५ जणांच्या टोळीचा एकावर गोळीबार व कोयत्याने हल्ला 

थरारक..! पूर्व वैमनस्यातून १५ जणांच्या टोळीचा एकावर गोळीबार व कोयत्याने हल्ला 

Next
ठळक मुद्देएकजण जखमी, चार जणांना अटक, १५ जणांवर गुन्हा दाखल 

पुणे  :चाकण येथे पूर्ववैमनस्यातून दहा ते पंधरा जणांच्या सराईत टोळक्यांनी एका सराईत गुंडावर गोळीबार करुन कोयत्याने वार केले. संकेत रमेश गाडेकर ( वय २०, रा. खंडोबा माळ, चाकण ) असे पायाला गोळी लागून तसेच कोयत्याचे वार होऊन जखमी झालेल्या सराईत गुंडाचे नाव आहे. ही घटना सोमवार ( दि.२७ ) रात्री अकराच्या सुमारास चाकणचा खंडोबा माळ येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री अकराच्या सुमारास संकेत हा मित्रांसोबत खंडोबा माळ येथे गप्पा मारत बसला होता. यावेळी वरील सराईत टोळी हातात कोयता, पिस्तूल आणि काठ्या घेऊन आले. व जुन्या भांडणाच्या वादातून सोन्याने संकेतवर दोन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी त्याच्या उजव्या पायाला लागली. तर राहुल माने याने संकेतवर कोयत्याने वार केले. या घटनेत संकेत गंभीर जखमी झाला असता हल्लेखोर पसार झाले.
याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात सोन्या अवताडे, सोन्या आगरकर, रोहन घोगरे, मोनेश घोगरे, प्रतीक सोनवणे, विवेक कु?्हाडे, राहुल माने, रवि कळसकर, प्रशांत दातार (  सर्व रा. चाकण ) व स्वप्नील उर्फ सोप्या शिंदे ( रा. रासे, ता.खेड ) आणि इतर चार ते पाच अनोळखी इसम असा १५ जणांविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली असून अटक झालेल्यांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेतील सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील दहिफळे व त्यांचे पथक पुढील तपास करीत आहेत. 
 

 

Web Title: Thrilling ..! A group of 15 people were attacked by firing and weapon on person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.