शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहर कॉपीमुक्तीच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: March 11, 2015 01:06 IST

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत पालक अधिक जागरूक आहेत.

पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत पालक अधिक जागरूक आहेत. त्यामुळे आपल्या पाल्याने परीक्षेदरम्यान गैरप्रकार करून उत्तीर्ण होऊ नये, याची काळजी त्यांच्याकडून घेतली जाते. त्याचप्रमाणे राज्य शिक्षण मंडळाकडून ‘गैरमार्गाविरोधात लढा’ उपक्रमांतर्गत जनजागृती केली जात आहे. यामुळे पुणे शहर कॉपीमुक्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. दहावीच्या गणित विषयाच्या पेपरदरम्यान ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत शहरातील विविध ठिकाणी शांततेप परीक्षा सुरू असल्याचे दिसून आले. पुणे विभागीय शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे विभागात लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर हायस्कूल हे एकच संवेदनशील परीक्षा केंद्र आहे. शहरातील इतर सर्व परीक्षा केंद्रांवर शांततेत परीक्षा घेतल्या जातात. त्याचप्रमाणे शहरातील बहुतांश शाळा बंदिस्त स्वरूपात आहेत. मंडळाचे अधिकारी तसेच शाळा प्रशासनातर्फे परीक्षा केंद्रात कॉप्या होऊ नयेत, याची काळजी घेतली जाते. तसेच, परीक्षा सुरळीत पार पडाव्यात, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या दक्षता समित्यासुद्धा काम करतात. त्यामुळे पुणे शहरात तुरळक ठिकाणी कॉपीचे प्रकार घडल्याचे दिसून येत. ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी मंगळवारी दहावीच्या गणित विषयाच्या परीक्षेची पाहणी केली. त्यात सर्व ठिकाणी सुरळीत परीक्षा सुरू असल्याचे निदर्शनास आले.औंध येथील शिवाजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या आवारात परीक्षेमुळे सामसूम होती. कोणीही शाळेत प्रवेश करू नये म्हणून शिपाई प्रवेशद्वारावर बसलेला होते. तसेच, खडकीतील आलेगावकर शाळेमध्येही परीक्षेनिमित्त बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अशीच स्थिती सेंट मेरी हायस्कूलमध्येही होती.शहरातील मध्यवर्ती परीक्षा केंद्रांची पाहणी केली असता, बाहेरील व्यक्तींकडून विद्यार्थ्यांना कॉपी पुरविणे किंवा इतर मार्गांनी मदत करणे अशक्य असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांना गैरमार्गाने सहाय्य होणार नाही, याची दक्षता केंद्रांवर घेण्यात आली होती. शहराच्या गजबजलेल्या मध्यवर्ती भागातील रमणबाग प्रशाला, अहिल्यादेवी प्रशाला तसेच अन्य काही परीक्षा केंद्रांमध्ये परीक्षा सुरू असताना बाहेरून कॉपी पुरविणे शक्य होत नाही किंवा तसे धाडसही कुणी करीत नसल्याचे आढळले. (प्रतिनिधी)