शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

स्वारगेट येथे चंदनाचे झाड चोरणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 6:59 PM

स्वारगेट भागातील एका सोसायटीच्या आवारात शिरून चंदनाचे झाड कापून नेणाऱ्या चोरट्यांना गस्त घालणाऱ्या पोलिसांनी मध्यरात्री पकडले.

पुणे : स्वारगेट भागातील एका सोसायटीच्या आवारात शिरून चंदनाचे झाड कापून नेणाऱ्या चोरट्यांना गस्त घालणाऱ्या पोलिसांनी मध्यरात्री पकडले. याप्रकरणी सुनिल नामदेव जमदाडे (वय ३४), दिलीप दत्तू पवार (वय ६०, दोघे रा. लक्ष्मीनगर, येरवडा) आणि कैलास प्रकाश चव्हाण (वय ३०,रा. ता. वाळवा, जि. सांगली) यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस शिपाई सुहास चिरमे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शंकरशेठ रस्त्यावरील न्यू प्रसन्ना सोसायटीच्या आवारात मध्यरात्री जमदाडे, पवार, चव्हाण शिरले. त्यांनी करवतीच्या सहाय्याने आवारातील चंदनाचे झाडाचा बुंधा कापला. त्यावेळी रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या पोलिसांनी जमदाडे, पवार, चव्हाण यांच्या संशयास्पद हालचाली पाहिल्या. पोलिसांना पाहताच तिघे जण तेथून पसार होण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी तिघांना पकडले. त्यांच्याकडून चंदनाच्या झाडाचा बुंधा जप्त करण्यात आला. पोलीस हवालदार शेख तपास करत आहेत. दुसऱ्या घटनेत एनडीए रस्त्यावर असलेल्या एका बंगल्यात शिरून चोरट्यांनी चंदनाच्या झाडाचा बुंधा कापून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हनुमंत मोरे (वय ५५, रा. कोपरे गाव, उत्तमनगर) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक ए. ए. दुगावकर तपास करत आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हाSwargateस्वारगेटnda puneएनडीए पुणेPoliceपोलिस