विरोध केल्याने मोबाईल चोरट्याने पाडले तीन दात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 04:16 PM2020-01-14T16:16:38+5:302020-01-14T16:17:37+5:30

फिर्यादी हे पर्वती टेकडीवर कार्तिकस्वामी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या जंगलातील भिंतीवर बसले होते.

Three teeth were fall down by mobile thieves | विरोध केल्याने मोबाईल चोरट्याने पाडले तीन दात

विरोध केल्याने मोबाईल चोरट्याने पाडले तीन दात

Next
ठळक मुद्देपर्वती टेकडीवरील घटना

पुणे : मोबाईल चोरी करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला विरोध केल्याने तरुणाला तीन दात गमविण्याची पाळी आली़. ही घटना पर्वती टेकडीवरील कार्तिकस्वामी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी दुपारी चार वाजता घडला.
याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी चोरट्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जनता वसाहतीत राहणाऱ्या ३५ वर्षाच्या तरुणाने फिर्याद दिली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पर्वती टेकडीवर कार्तिकस्वामी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या जंगलातील भिंतीवर बसले होते.त्यावेळी एक चोरटा त्यांच्याजवळ आला. त्याने फिर्यादी यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला विरोध केल्याने चोरट्याने त्यांच्या हनुवटीवर चाकूने वार केला. त्यानंतर त्यांना खाली पाडून जीवे मारण्याच्या इराद्याने चाकूने त्यांच्या पाठीमागील बाजूला, तोंडावर मारुन जखमी केले. त्यांच्या तोंडावर फाईट मारली. त्यात त्यांचे वरच्या बाजूचे तीन दात पडले. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात त्यांच्या डाव्या हाताचे मनगट व डाव्या पायाचे खुब्याला फॅक्चर झाले. चोरट्याने त्यांच्याकडील मोबाईल व खिशातील २०० रुपये असा ७ हजार २०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. 
दत्तवाडी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे कपड्याच्या दुकानात कामाला आहे़ ते फिरायला गेले होते. त्यांच्या पायाच्या खुब्याला फॅक्चर झाले असून सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. त्या भागात सीसीटीव्ही नाहीत. फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनावरुन पोलीस उपनिरीक्षक के. डी. संकपाळ अधिक तपास करत आहेत. 

Web Title: Three teeth were fall down by mobile thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.