भोरमध्ये शॉर्टसर्किटमुळे आगीत तीन दुकाने खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 16:59 IST2025-02-10T16:56:18+5:302025-02-10T16:59:38+5:30
भोर रामबाग रोडवरील गट क्र. ५९ मध्ये गणेश ट्रेडर्स, मोबाइल शाॅपी, ओंबळे अमृततुल्य दुकाने

भोरमध्ये शॉर्टसर्किटमुळे आगीत तीन दुकाने खाक
भोर : रामबाग रोडवरील किराणा दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रविवारी (दि. ९) सकाळी ९च्या सुमारास घडली. भोर पोलिस, भोर अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आण्याचे काम केले.
भोर रामबाग रोडवरील गट क्र. ५९ मध्ये गणेश ट्रेडर्स, मोबाइल शाॅपी, ओंबळे अमृततुल्य दुकाने आहेत. रविवारी सकाळी ९ वाजता किराणा दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून भूषण शशिकांत गावडे (रा. शिरवळ, ता. खंडाळा) यांच्या दुकानातील किराणा मालासह साहित्य जळून नुकसान झाले. बाजूलाच असणाऱ्या मोबाइल शाॅपीला आगीची झळ बसल्यामुळे निखिल तळेकर (रा. उत्रौली, ता. भोर) यांचे मोबाइल इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून नुकसान झाले. तसेच ओंबळे अमृततुल्य यांचे फर्निचर जळून खाक झाले आहे. दरम्यान, हॉटेल मालक नवनाथ ओंबळे यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले.
तर किराणा दुकानाच्या मागे असणाऱ्या मंत्रा टिशू पेपर कंपनीचे साहित्य, इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून मालक सोहम सदाशिव पवार (रा. भोर) यांचे लाखाेंचे नुकसान झाले आहे. पंचनामावेळी गाव कामगार तलाठी उदय कांबळे, कोतवाल धीरज दानवले उपस्थित होते. घटनास्थळी भोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आण्णा पवार, सहायक पोलिस अनिल चव्हाण, दीप्ती करपे, हवालदार राहुल मखरे, भोर नगरपरिषदेचे आरोग्य अधिकारी महेंद्र बांदल, अग्निशमन विभागाचे कर्मचारी अमीर आत्तार, आकाश सागळे, बाळा शेटे, सूरज नांगरे, दत्तात्रय पवार, सागर पवार यांनी आग आटोक्यात आणण्यात शर्थीचे प्रयत्न केले.