शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

तीन महिने लवासाच्या जंगलात लपवून ठेवलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 6:27 PM

आरोपी हा २१ वर्षाचा असून तो मुलीच्या ओळखीचा आहे़. त्याने तिला आमिष दाखवून ८ फेब्रुवारीला पळवून नेले होते़ 

पुणे : चतु:श्रृंगी पोलिसांकडे एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार ८ फेबु्रवारी रोजी दाखल होती़. या मुलीला पळवून नेताना त्याने काहीही मागमूस ठेवला नव्हता़. तब्बल तीन महिन्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाला एक छोटासा धागा मिळाला़. त्यावरुन पोलिसांनी लवासाच्या डोंगरापलीकडे डोंगरात लपून बसलेल्या या दोघांचा शोध घेऊन मुलीची सुटका केली़. आरोपी हा २१ वर्षाचा असून तो मुलीच्या ओळखीचा आहे़. त्याने तिला आमिष दाखवून ८ फेब्रुवारीला पळवून नेले होते़. तो मोबाईलही वापरत नव्हता़. तसेच कोणत्याही नातेवाईकाशी त्याने संपर्क साधला नव्हता़. त्यामुळे काहीही कळायला मार्ग नव्हता़. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस नाईक किरण अब्दागिरे यांना एक छोटासा धागा मिळाला़. त्याचे तांत्रिक विश्लेषण केल्यावर मुलगी व आरोपी हे मुळशी तालुक्यातील तव या गावी असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली़. सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगिता कुदळे, हवालदार रमेश लोहकरे, ननिता येळे, राजेंद्र ननावरे, निलेश पालवे, संदीप गायकवाड आणि किरण अब्दागिरे हे पथक लवासाच्या पाठीमागील डोंगरात शोध घेऊ लागले़. या जंगलात काहीही माहित नसताना व हिंस्त्र प्राण्याची तमा न बाळगता ते तव गावाजवळच्या डोंगरावर शोध घेत राहिले़ तेव्हा त्यांना एक झोपडी दिसून आली़ त्यांनी तेथे जाऊन पाहिल्यावर या झोपडीत ही मुलगी होती़. आरोपीने आपल्या लांबच्या आजी, आजोबाबरोबर तिला ठेवले होते़ त्याने दररोज धान्य व अन्य साहित्य अगोदरच आणून ठेवले होते़. पोलिसांनी त्याला चतु:श्रृंगी पोलिसांच्या हवाली करुन मुलीला नातेवाईकांच्या ताब्यात दिले़.  

टॅग्स :PuneपुणेKidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस