शहरं
Join us  
Trending Stories
1
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
2
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
3
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
4
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
5
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
6
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
7
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
8
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
11
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
12
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
13
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
14
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
15
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
16
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
17
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
18
"...तर पाकिस्तानी खेळाडू भारतात खेळू शकतात" सरकारचा मोठा निर्णय!
19
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
20
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
Daily Top 2Weekly Top 5

दौंडज खिंडीत अपघातात ३ ठार

By admin | Updated: July 2, 2017 02:19 IST

पुणे-पंढरपूर मार्गावर जेजुरी नजीक दौंडजखिंडीत पवारवाडी फाट्यावर अल्टो गाडी व ट्रक यांची समोरासमोर धडक झाल्याने अल्टोतील

लोकमत न्यूज नेटवर्क
जेजुरी : पुणे-पंढरपूर मार्गावर जेजुरी नजीक दौंडजखिंडीत पवारवाडी फाट्यावर अल्टो गाडी व ट्रक यांची समोरासमोर धडक झाल्याने अल्टोतील तीन जण ठार झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री पावणेबाराला झाला. ट्रक चालकाला जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे.
मनोज गोविंद जाधव (वय ३५), चंद्रशेखर वसंत फडतरे (वय ३८) धनाजी एकनाथ घोरपडे (वय  ४०, तिघेही रा. पाडेगाव ता.फलटण, जि. सातारा) या तिघांचा अपघातामध्ये मृत्यू झाला.
ट्रकचालक संदीप सुदाम आजबे (वय २४) रा. मंतरवाडी, पुणे, ता. हवेली) यांना जेजुरी पोलिसांनी अटक केली.
धनाजी घोरपडे यांच्या अल्टो (एमएच १२/सीआर ६८२५) गाडीतून जेजुरीकडून नीरेकडे जात होते. शुक्रवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास दौंडज खिंडीत पवारवाडी फाट्याजवळ नीरेकडून जेजुरीकडे येणारा ट्रकची (एमएच १२/सीटी ८४८७) समोरासमोर धडक झाली. भरधाव वेगात ट्रक असल्याने मोठा अपघात झाला.
कारमधील दोन जण जागीच ठार झाले. पोलिसांना खबर मिळताच जेजुरी पोलीस तातडीने हजर झाले. अपघातस्थळी पोहोचले तेव्हा दोन जण जागीच ठार झाले होते तर गंभीर जखमी असलेल्या धनाजी घोरपडे यांना जेजुरीत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपचारा दरम्यान धनाजी घोरपडे यांचाही मृत्यू झाला. अपघाताची खबर न देता निघून जात असताना ट्रकचालक संदीप सुदाम आजबे याला जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे करीत आहेत.
तिघेही पाडेगावचे राहणारे असल्याने पाडेगाव परिसरातील ग्रामस्थ हळहळ व्यक्त करीत आहेत. पाडेगावचे नागरिक शवविच्छेदनाच्या वेळी गर्दी करून होते.  दुपारी तिघांचेही शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात  देण्यात आले.