शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

शहरात मंगळसूत्र चोरीच्या तीन घटना

By admin | Updated: May 26, 2014 05:20 IST

शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकीस्वारांनी मंगळसूत्र व दागिने हिसका मारुन पळवून नेले. यात तब्बल पाच लाखांचा ऐवज लुटून नेला

पिंपरी : शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकीस्वारांनी मंगळसूत्र व दागिने हिसका मारुन पळवून नेले. यात तब्बल पाच लाखांचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी निगडी, हिंजवडी व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे सोने चोरट्यांची टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. प्राधिकरण, निगडीत पती व मुलांसह दुचाकीवरून जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी हिसका मारून चोरून नेले. तेरा तोळे वजनाचा २ लाख २४ हजार रु पये किमतीचा हा ऐवज आहे. याप्रकरणी अविनाश शंकर लोंढे (वय ३३, रा. सरिता अपार्टमेंट, कासारवाडी) यांनी निगडी पोलिसांत फिर्याद दिली. लोंढे त्यांची पत्नी आणि मुले हे शुक्र वारी रात्री मोटारसायकलवरून प्राधिकरणातील भेळ चौकातून जात असताना हा प्रकार घडला. पुणे - नाशिक महामार्गावरील साधुराम मंगल कार्यालयाच्या आवारात लग्न समारंभातून बाहेर पडत असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी १ लाख ६० हजार रु पये किमतीचे आठ तोळ्यांचे मंगळसूत्र हिसका मारून नेले. स्वप्निल योगेश गव्हाणे (वय २५, रा. मारु ती सदन, वाघेरे कॉलनी, पिंपरीगाव) यांनी या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शनिवारी रात्री हा प्रकार घडला. गव्हाणे हे नातेवाइकांचा लग्न समारंभ आटोपून पत्नी व मुलांसह कार्यालयातून बाहेर पडत असताना हा प्रकार घडला. पुनावळे येथील पुलावर पती व मुलांसह दुचाकीवरून जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील ४ तोळे वजनाचा १ लाख २२ हजार रु पये किमतीचा राणीहार दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसका मारून नेला. संध्या बाळासाहेब पवार (वय ५५, रा. युवराजनगर, रहाटणी) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. (प्रतिनिधी)