शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

रक्तचंदनाची तस्करी करणा-या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रक्तचंदनाची तस्करी करून टेम्पोतून २७० किलो रक्तचंदन घेऊन जाणा-यांना खंडणीविरोधी पथकाने पकडले. विकी संजय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रक्तचंदनाची तस्करी करून टेम्पोतून २७० किलो रक्तचंदन घेऊन जाणा-यांना खंडणीविरोधी पथकाने पकडले.

विकी संजय साबळे (वय १९, रा. मांजरी, हडपसर), रोहित रवी रुद्राप (वय २०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) आणि अ‍ॅलेन कन्हैया वाघमारे (वय २५, रा. कोंढवा) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

खंडणीविरोधी पथक २ चे अधिकारी अवैध कारवायांची माहिती घेत असताना पोलीस अंमलदार भूषण शेलार व अमोल पिलाणे यांना याबाबत माहिती मिळाली होती. कोंढवा परिसरातून एक टेम्पो लोणी काळभोर परिसरात विक्रीसाठी येणार होता. लोणी काळभोर टोलनाक्याजवळ पोलिसांनी सापळा लावला. यावेळी टेम्पोची तपासणी केल्यावर त्यात २७ लाख रुपयांचा २७० किलो रक्तचंदनाचा साठा आढळून आला. पोलिसांनी हा साठा व टेम्पो असा ३२ लाखांचा माल जप्त केला. विकी साबळे व रोहित रुद्राप यांच्याकडे केलेल्या चौकशीत रक्तचंदन विक्रीसाठी अ‍ॅलेन वाघमारे याला देणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यालाही पोलिसांनी अटक केली. वन परिमंडळाचे अधिकारी मंगेश सपकाळे व वनरक्षक मनोज पारखे यांनी रक्तचंदनाची पडताळणी करून पोलिसांना तपासात मदत केली.

खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंजाड, श्रीकांत चव्हाण व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.