पुणे-सातारा महामार्गावर लूटमार करणाऱ्या तिघांना अटक, भुईंज येथून दुचाकीसह मोबाईल व पैसे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 12:25 PM2024-04-08T12:25:27+5:302024-04-08T12:25:54+5:30

भुईंज येथून दुचाकीसह मोबाईल व पैसे जप्त केले आहेत...

Three arrested for looting on Pune-Satara highway, mobile phone and money seized from Bhujanj | पुणे-सातारा महामार्गावर लूटमार करणाऱ्या तिघांना अटक, भुईंज येथून दुचाकीसह मोबाईल व पैसे जप्त

पुणे-सातारा महामार्गावर लूटमार करणाऱ्या तिघांना अटक, भुईंज येथून दुचाकीसह मोबाईल व पैसे जप्त

नसरापूर (पुणे) :पुणे-सातारा महामार्गावर रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना थांबवून मारहाण करत लूटमार करणाऱ्या तिघांना राजगड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून भुईंज येथून दुचाकीसह मोबाईल व पैसे जप्त केले आहेत.

महामार्गावर केलेल्या लूटमार व मारहाणप्रकरणी मोहम्मद अनिस शेख (वय २७, रा. मलकापूर, ता. कऱ्हाड, जि. सातारा) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. राजगड स. पो. नि. संजय सुतणासे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि. ५) रात्री एक वाजण्याच्या सुमारास शेख हे त्यांची दुचाकीवरून क्रमांक (एमएच ११, बीजी ४३३६)ने सातारा बाजूकडे जात होते. महामार्गावर कामथडी (ता. भोर) येथे मागून स्प्लेंडर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना थांबवले. ‘तुमची पाठीमागे बांधलेली बॅग पडायला आली आहे,’ असे सांगून त्यांनी शेख यांना थांबवले होते. थांबल्यावर त्यांना मारहाण करत त्यांच्याकडील २१ हजार रुपये किमतीचा मोबाइल आणि रोख बाराशे रुपये घेऊन त्यांनी तेथून पोबारा केला होता.

घटनेची माहिती मिळताच, राजगड पोलिस ठाण्यातील रात्र गस्ती पोलिसांनी तातडीने पाठलाग करत सुनील रघुनाथ मादस्वार (वय २१, रा. कोथरूड, पुणे), ऋषिकेश चंद्रकांत चंदनवाले (वय २०, रा. फुरसुंगी, पुणे) आणि लकी देविदास बर्गे (वय २३, रा. सातववाडी, हडपसर) यांना अटक केली आहे. या तीनही आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी राजगड पोलिस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Three arrested for looting on Pune-Satara highway, mobile phone and money seized from Bhujanj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.