'तुझी बदनामी करेन...' फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेस शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2023 09:43 IST2023-08-08T09:43:24+5:302023-08-08T09:43:30+5:30
महिलेने आरोपीविरोधात चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली

'तुझी बदनामी करेन...' फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेस शिवीगाळ
पुणे: खराडी परिसरात आयटी पार्कमध्ये काम करीत असलेल्या ३० वर्षीय महिलेचा पती दारू पिला आहे, असे तिला खोटे सांगून कंपनीमधून बाहेर बोलावले. त्यानंतर ओळखीच्या व्यक्तीने तिला एका दुचाकीवर बसवून एका ठिकाणी नेले. यादरम्यान एका ओळखीच्या मित्राने महिलेला तुझे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तुझी बदनामी करेन, अशी धमकी देऊन तिला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या प्रकरणी पीडित महिलेने आरोपीविरोधात चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून लगेचच हनुमंत शिवाजी कंधारे (३५, रा. वाघोली) याला अटक केली. संबंधित महिलेचा आरोपी मित्र असून, त्याने २५ एप्रिल ते २७ जुलैदरम्यान तिचा पाठलाग केला. तसेच तिचे फोटो काढून ते गावातील सोशल मीडियाच्या ग्रुपवर पाठवून तुझी बदनामी करीन, अशी धमकी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक घोडके करीत आहेत.