Ganesh Bidkar | "लय मस्ती आली का, चुपचाप 25 लाख दे...", भाजप नेते गणेश बिडकर यांना धमकीचे फोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 15:52 IST2023-03-31T15:50:53+5:302023-03-31T15:52:31+5:30
या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल...

Ganesh Bidkar | "लय मस्ती आली का, चुपचाप 25 लाख दे...", भाजप नेते गणेश बिडकर यांना धमकीचे फोन
-किरण शिंदे
पुणे : पुण्यातील भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले गणेश बिडकर यांना शिवीगाळ करण्यात आला आहे. अनोळखी नंबरवरुन धमकी देत खंडणी मागण्याचा प्रकार घडला आहे. याबद्दलची तक्रार गणेश बिडकर यांनी सायबर पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश बिडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रामनवमी उत्सव सुरू असताना त्यांना एका अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सॲप कॉल करून मराठी आणि हिंदी भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि "लई मस्ती आली का? चुपचाप पंचवीस लाख रुपये दे" अशी खंडणी देखील मागितली. पैसे नाही दिले तर तुझी बदनामी करू असे देखील या अनोळखी व्यक्तीने बिडकर यांना सांगितले.
काही दिवसांपूर्वी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने खंडणी मागण्याचा प्रकार ताजा असतानाच हा प्रकार घडला आहे.