शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
2
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
3
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
4
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
5
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
6
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
7
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
8
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
9
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
10
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
11
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
12
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
13
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
14
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
15
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
16
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
17
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
18
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
19
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
20
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

फॉर्च्युनर, मोबाईल घेऊन हगवणेंच्या मनाला शांती नाही; अधिक महिन्यात सोने, चांदीची ताट मागितली - अनिल कस्पटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 18:27 IST

गाडी दिली नाही तर लग्न मोडेल अशी धमकी दिली होती, माझ्याकडे गाडी, चांदीच्या ताटाची, सोन्याची मागणी त्यांनी केली, अधिक महिन्यात इतर गोष्टी आम्ही त्यांना दिल्या

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पत्नी, सासू, नणंद सासरा दीर यांना काल शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी  शिवाजीनगर कोर्टात हगवणे यांच्या वकिलांनी अजब युक्तिवाद केला. आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत. आम्ही चाळीस लाखांच्या फॉर्चुनरसाठी कशाला छळ करू असं म्हणत वकिलांनी सवाल उपस्थित केला. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते‌. ते आम्ही पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. आम्हाला न्याय हवा असल्याचे त्यांनी युक्तिवादात सांगितले. वैष्णवीची टेंडंसी सुसाईड करण्याची होती. तीचे एका व्यक्तीसोबतचे चॅट पकडले गेले होते. अशी अजब वक्तव्य यावेळी वकिलांनी केली. त्यानंतर आज वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेत वकिलांच्या वक्तव्याचा खुलासा केला आहे.

हगवणे यांनी फॉर्च्युनर, मोबाईल, पैसे अशा अनेक गोष्टी मागितल्या होत्या. त्यांचे मन भरच नव्हते. त्यांनी धमकी देऊन आमच्याकडून फॉर्च्युनर घेतली. लग्न मोडण्याची धमकी देत आम्हाला या गाडीची मागणी केली होती. तीही आम्ही घाबरून दिली. त्यानंतर  चांदीच्या ताटाची मागणी सोन्याची मागणी त्यांनी केली. अधिक महिन्यात इतर मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा कस्पटे यांनी यावेळी केला आहे. 

कस्पटे म्हणाले, छळ केला नाही असं म्हणत आहेत. गाडी नाही मागितली असाही म्हणत आहेत. फॉर्च्यूनर देण्याअगोदर मी एमजी हेक्टर ही गाडी बुक केली होती. त्यांनी वादावादी केली. मला फॉर्च्युनर नाही दिली तर मी यांची हेक्टर पेटवून देईन असं सांगण्यात आलं म्हणून फॉर्च्युनर दिली. आरोपीकडे 5 कोटीच्या गाड्या नाहीत. याच्याकडे एकच गाडी मी दिलेली आहे. गाडी दिली नाही तर लग्न मोडेल अशी धमकी दिली होती. अगोदर दोन लग्न मोडली होती. माझ्याकडे गाडी, चांदीच्या ताटाची मागणी सोन्याची मागणी त्यांनी केली. अधिक महिन्यात इतर मागणी करण्यात आल्या. माझ्या मुलीचे दोन लग्न मोडली त्याला हगवणे कुटुंब जबाबदार आहेत. 

वैष्णवीच्या लग्नात नेमका किती खर्च झाला त्याचे तपशील खालील प्रमाणे..

- आलिशान रिसॉर्ट भाड्याने: लग्नासाठी दहा लाख रुपयांचे भाडे असलेले रिसॉर्ट घेतले गेले.

- स्टेज डेकोरेशन: सजावटीसाठी एकट्या स्टेजवर २२ लाख रुपये खर्च झाले.

- जेवणावळीचा खर्च: पाच हजार पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले. प्रत्येकी जेवणाचा खर्च १,००० रुपये धरून एकूण ५० लाख रुपये केवळ जेवणावर खर्च झाले.

- सत्कार-स्वागत आणि कपडे: पाहुण्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या कपड्यांसाठी वेगळा मोठा खर्च झाला.

- इव्हेंट मॅनेजमेंट खर्च: संपूर्ण लग्नाचे कंत्राट खासगी इव्हेंट कंपनीला देण्यात आले आणि त्यासाठी लाखो रुपये वैष्णवीच्या वडिलांकडून घेतले गेले.

- हुंडा म्हणून: हगवणे कुटुंबीयांनी ५१ तोळे सोनं, चांदीची भांडी आणि फॉर्च्युनर गाडी घेतली.

- एकूण मिळून एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी किमान दीड कोटी रुपये खर्च झाला. 

टॅग्स :PuneपुणेVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेPoliceपोलिसGoldसोनंSilverचांदीMONEYपैसाcarकार