शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांचा’ अर्धा यूपी आपल्याकडे पोट भरायला येतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 15:12 IST

पिंपरी : ज्यांचा अर्धा उत्तर प्रदेश आपल्याकडे येऊन पोट भरतो, ते भोसरी मतदारसंघात येऊन म्हणतात, ‘बटेंगे तो कटेंगे’. समाजात ...

पिंपरी : ज्यांचा अर्धा उत्तर प्रदेश आपल्याकडे येऊन पोट भरतो, ते भोसरी मतदारसंघात येऊन म्हणतात, ‘बटेंगे तो कटेंगे’. समाजात फूट पाडणारी विधाने करून आमच्यावर काही परिणाम होणार नाही. ही सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील माणसे आहेत. येथे ‘बचेंगे तो और लढेंगे’ आणि ‘जुडेंगे और जितेंगे’ हे चालते. त्यामुळे सुसंस्कृत उमेदवार अजित गव्हाणे यांना निवडून द्या, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सभेत केले.महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ टाळगाव चिखली येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी कोल्हे बोलत होते. यावेळी शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, रवी लांडगे, धनंजय आल्हाट, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष इम्रान शेख, यश साने, माजी नगरसेवक पंकज भालेकर आदी उपस्थित होते.डॉ. कोल्हे म्हणाले की, लोकसभेला मतांची कडकी बसल्यानंतर यांना लाडकी बहीण आठवली. मग बहिणींना १५०० रुपये देण्यास सुरुवात केली; पण २०१४ ला १५ लाख रुपये देण्याची केलेली भाषा १५०० रुपयांवर कधी आली, हे जनतेला समजले नाही. एका हाताने लाडक्या बहिणींच्या नावाखाली पैसे देतात आणि दुसऱ्या हाताने काढून घेतात. महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दहा वर्षांपूर्वी यांचे नेते सोयाबीनला सात हजार रुपये भाव मिळावा म्हणत होते. आज पेट्रोल, डिझेल, गोडेतेल, डाळी, कडधान्य सर्व महाग झाले आहे; मात्र सोयाबीन साडेचार हजार रुपयांवरून तीन हजार रुपयांवर आले आहे. राज्यातील दोन पक्ष यांनी विकासासाठी फोडले, मात्र विकास झाला नाही. विकास झाला असता तर राज्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या. ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सुसंस्कृत उमेदवारांमागे उभे रहा. म्हणून मी लढण्यासाठी उभा राहिलोअजित गव्हाणे म्हणाले की, भोसरी मतदारसंघातील नागरिकांनी गेली दहा वर्षे खूप भोगले आहे. त्यामुळे आता परिवर्तन करण्याची गरज आहे. ज्यावेळी आपण एखादा लोकप्रतिनिधी निवडतो, त्यावेळी आपल्याला त्यांच्याकडून विकासकामांची अपेक्षा असते; मात्र आपला भ्रमनिरास झाला म्हणून मी निवडणूक लढवण्यासाठी उभा राहिलो.  

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Jayant Patilजयंत पाटीलBJPभाजपा