शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

यंदा "राजा - प्रधान" अन् "सावकार - संग्राम" बैलजोडींना माऊलींच्या पालखीला मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 10:08 IST

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ सोहळ्यापूर्वी बैलांचा शेती मशागत, बैलगाडी ओढणे इ. सराव करून घेतला जाणार

आळंदी : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्यासाठी यंदा बैलजोडीचा मान घुंडरे घराण्याला मिळाला आहे. आळंदीतील विवेक ज्ञानेश्वर घुंडरे, जनार्दन घुंडरे, अर्जुनराव मारुती घुंडरे, सचिन बाळासाहेब घुंडरे यांना संयुक्तपणे हा मान असून विवेक घुंडरे यांनी सातारा जिल्ह्यातील बावधन येथून ''राजा - प्रधान" ही बैलजोड सहा लाख रुपयांना तर ''सावकार - संग्राम'' ही बैलजोड हिंजवडी येथून पाच लाख रुपयांना खरेदी केली आहे.

 अर्जुनराव मारुती घुंडरे व सचिन बाळासाहेब घुंडरे यांनी नांदेड सिटी येथून ५ लाख ५१ हजार रुपयांना ''मल्हार - आमदार'' तर दुसरा बैलजोड "माऊलीं - शंभू" उत्तम नगर येथून २ लाख ५१ हजार रुपयांना खरेदी केला आहे. दरम्यान संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ सोहळ्यापूर्वी बैलांचा शेती मशागत, बैलगाडी ओढणे इ. सराव करून घेतला जाणार आहे. या बैलांसाठी खुराक शाळूची वैरण, हिरवा चारा, पेंड, खारीक खोबऱ्याचा भुगा, बैल खाद्य देत आहेत.      दरम्यान सोमवारी (दि. २) या मानाच्या बैलजोडींची शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. माऊलींच्या महाद्वारात बैलांची राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, चैतन्य महाराज लोंढे, ॲड. रोहणी पवार, पुरुषोत्तम महाराज पाटील, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, पंढरपूर मंदिर समितीच्या माधवी निगडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, अजित वडगावकर, ज्ञानेश्वर वीर, राहुल चिताळकर, विलासराव घुंडरे, रामचंद्र भोसले, नंदकुमार कुऱ्हाडे, संजय घुंडरे, अशोक कांबळे, सागर भोसले, योगीराज कुऱ्हाडे, सुनील रानवडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. बैलजोडी मानकऱ्यांना देवस्थानच्या वतीने नारळ प्रसाद देण्यात आला.

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीSocialसामाजिकTempleमंदिरsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022