वृद्धेचे तेरा तोळे दागिने रावेत येथून लंपास

By Admin | Updated: May 9, 2017 03:50 IST2017-05-09T03:50:41+5:302017-05-09T03:50:41+5:30

लग्नसोहळा आटोपून घरी परतणाऱ्या वृद्धेच्या गळ्यातील सुमारे एक लाख ५६ हजार रुपये किमतीचे १३ तोळ्यांचे सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून पोबारा केला.

Thirtega Tale of old man lamps from Ravet | वृद्धेचे तेरा तोळे दागिने रावेत येथून लंपास

वृद्धेचे तेरा तोळे दागिने रावेत येथून लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
किवळे : लग्नसोहळा आटोपून घरी परतणाऱ्या वृद्धेच्या गळ्यातील सुमारे एक लाख ५६ हजार रुपये किमतीचे १३ तोळ्यांचे सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून पोबारा केला.
ही घटना कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील रावेत येथील धर्मराज मंगल कार्यालयाच्या वाहनतळाजवळ रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.
मंगल रोहिदास मांढरे (वय ६६, रा. वारजे माळवाडी, मंगलमूर्ती कॉम्प्लेक्स, पुणे) यांनी देहूरोड ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांढरे या मुलगा व नातवासमवेत रविवारी रावेत येथील धर्मराज मंगल कार्यालयात विवाहानिमित्त कुटुंबियासह आल्या होत्या.
सोहळ्यानंतर घरी परतत असताना वाहनतळातील चारचाकीत बसत असताना पाठीमागून एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोन इसमांपैकी मागे बसलेल्या इसमाने (वय अंदाजे २५ ते ३०) त्यांच्या गळ्यातील सोन्याचे साडेनऊ तोळ्यांचे गंठण व साडेतीन तोळ्यांचा राणीहार असा एकूण १३ तोळ्यांचा ऐवज हिसकावून पळून गेले.
पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण मोरे करीत आहेत.

Web Title: Thirtega Tale of old man lamps from Ravet