लग्नाच्या आमिषाने पुण्यात तेरा वर्षीय मुलीवर बलात्कार; प्रेग्नेंट राहिल्यानंतर उघडकीस आला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 10:28 IST2023-01-17T10:26:27+5:302023-01-17T10:28:03+5:30

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर 19 वर्षीय आरोपीविरोधात गुन्हा दाखल...

Thirteen-year-old girl molested in Pune on the lure of marriage revealed after being pregnant | लग्नाच्या आमिषाने पुण्यात तेरा वर्षीय मुलीवर बलात्कार; प्रेग्नेंट राहिल्यानंतर उघडकीस आला प्रकार

लग्नाच्या आमिषाने पुण्यात तेरा वर्षीय मुलीवर बलात्कार; प्रेग्नेंट राहिल्यानंतर उघडकीस आला प्रकार

पुणे/किरण शिंदे : एकाच परिसरात राहणाऱ्या आणि ओळखीच्या असणाऱ्या एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याने 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आहे. वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळेपडळ परिसरात ही घटना घडली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर 19 वर्षीय आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी 2022 ते जून 2022 या कालावधीत हा सर्व प्रकार घडला. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी आणि आरोपी तरुण एकाच परिसरात राहण्यासाठी आहेत. दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहे. आरोपीने पीडीते सोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले आणि त्यानंतर तिला खेळण्याच्या बहाण्याने घरी घेऊन गेला. या ठिकाणी आरोपीने माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, आपण लग्न करू असे म्हणून तिच्यासोबत जबरदस्ती केली. पीडित मुलीच्या अज्ञान पणाचा फायदा घेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले. त्यानंतरही आरोपीने राहत्या घरात वेळोवेळी या मुलीसोबत लैंगिक अत्याचार केले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी या मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांच्या तपासणीत ती 28 आठवड्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Thirteen-year-old girl molested in Pune on the lure of marriage revealed after being pregnant