शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास वाड्या-वस्त्यांची ‘सौरपंपा’ने भागणार तहान

By admin | Updated: March 16, 2015 04:33 IST

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत २०१० पासून सौरपंपवार आधारित जिल्ह्यातील सुमारे ४५ वाड्या-वस्त्या पाणीटंचाईमुक्त झाल्या असून,

पुणे : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत २०१० पासून सौरपंपवार आधारित जिल्ह्यातील सुमारे ४५ वाड्या-वस्त्या पाणीटंचाईमुक्त झाल्या असून, मेअखेरपर्यंत ५० कामे प्रगतिपथावर आहेत. या योजनेमुळे दुर्गम भागातही नळाद्वारे घराघरांत पाणी मिळणार आहे. महाराष्ट्रात ८५ टक्के ग्रामीण पाणीपुरवठा हा भूजलावर अवलंबून असल्याने विंधन विहिरीवरील हातपंप हा महत्त्वाचा घटक आहे. याचा विचार करून ग्रामीण जनतेला पिण्याच्या पाण्याचा योग्य प्रमाणात व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने ११ जानेवारी २०१० च्या शासननिर्णयाद्वारे सौरपंपावर आधारित लघुनळ-पाणीपुरवठा योजना जिल्ह्यात राबविण्यात आल्या. योजनेसाठी साधारण ५ लाख रुपये खर्च होता. १० टक्के लोकवर्गणीची अट आहे. या योजनेमुळे भारनियमनकाळात तसेच विद्युत पंप नादुरुस्त झाल्यास हातपंपाद्वारे पाणी मिळते. नळ-पाणीपुरवठा योजनेच्या तुलनेत देखभाल-दुरुस्ती व अंमलबजावणीसाठी कमी खर्च येतो. भौगोलिक परिस्थितीमुळे वीजपुरवठा घेणे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर नसल्याने केवळ विंधन विहिरींवर अवलंबून असलेल्या वाड्या-वस्त्यांवर या योजना राबविण्यात येत आहेत. सन २०१०-२०११ मध्ये ३ गावांत, २०११-२०१२ मध्ये ४ गावांत तर २०१२-२०१३ मध्ये ३८ गावांत योजना राबविण्यात येऊन त्या कार्यरत आहेत. तसेच २०१४-२०१५ मध्ये ५० गावांत या योजना राबविण्यात येत असून, त्या प्रगतिपथावर आहेत. पुढील वर्षात २०१५-२०१६ मध्ये ६० गावांत कामे प्रस्तावित असल्याचे यांत्रिकी विभागाचे उपअभियंता संदीप भुसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)