शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

पुणे वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांत केली तेराशे वाहने जप्त; संचारबंदी आदेशाचे उल्लंघन प्रकरणी 476 जणांवर गुन्हे दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 7:04 PM

विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात

ठळक मुद्देशहरातील संचारबंदी तसेच जमावबंदीचे सुधारित आदेश जारी

पुणे : संचारबंदी आणि टाळाबंदीच्या काळात घराबाहेर पडण्यास मनाई केली असताना बिनदिक्कतपणे बाहेर पडणाऱ्यांवर पुणे वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन दिवसांत तेराशे वाहने पोलिसांनी जप्त केली असून त्यात सर्वाधिक संख्या दुचाकी वाहनांची आहे. याबरोबरच आता आहे.सकाळी फेरफटका मारायला बाहेर पडणारे तसेच विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करण्यात आले आहेत. तीन मेपर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढविण्यात आल्यानंतर सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे शहरातील संचारबंदी तसेच जमावबंदीचे सुधारित आदेश जारी केले आहेत.प्रशासनाने पाठविलेल्या प्रस्तावानंतर शहरातील २२ भागात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.संचारबंदीचे आदेश लागू झाल्यानंतरही शहरात अनेकजण किरकोळ कामांसाठी घराबाहेर पडत आहेत.सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत शहरातील किराणा माल, भाजीपाला विक्रीची दुकाने खुली ठेवण्यात आली आहेत.काहीजण किरकोळ कामाचे निमित्त करून घरातून बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले आहे.करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी नागरिकांनी शक्यतो एकमेकांशी संपर्क टाळावा.सकाळी फिरायला जाणाऱ्यांनी बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.पोलिसांनी केलेल्या आवाहनाकडे काणाडोळा करून अनेकजण  घराबाहेर पडत आहेत.अशांविरोधात पोलिसांनी थेट संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. 

हडपसर, स्वारगेट, बिबवेवाडी पोलिसांनी गुरूवारी (१६ एप्रिल)सकाळी फिरायला बाहेर पडलेल्या नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांना समज दिली.काहींना उठाबशा काढण्याची शिक्षाही दिली.दरम्यान, शुक्रवारी (१७ एप्रिल) हडपसर भागात काहीजण फेरफटका मारायला बाहेर पडले.हडपसर भागातील तुकाई टेकडी, ग्लायडिंग सेंटर येथे सकाळी फेरफटका मारणाºया १२ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी सांगितले. अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडणारे नागारिक पोलिसांकडून डिजिटल परवाना घेतात.पोलिसांनी के लेल्या पाहणीत काहीजण किरकोळ कारणे सांगून घराबाहेर पडत आहेत.

संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने 476 जणांवर गुन्हे दाखल विनाकारण घराबाहेर पडणा- या वाहनचालकांविरोधात हडपसर, बिबवेवाडी, चतु:श्रृंगी, सातारा रस्ता भागात कारवाई करण्यात आली.गेल्या दोन दिवसात तेराशे वाहने जप्त करण्यात आली आहेत.संचारबंदीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ४७६ नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तसेच मास्क न परिधान करता बाहेर पडणाºया ७२ जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेतील पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीसtwo wheelerटू व्हीलरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस