The thieves robbry in a jewellery shop at dhayri | धायरीत सराफी दुकान फोडून चोरट्यांनी केली चोरी

धायरीत सराफी दुकान फोडून चोरट्यांनी केली चोरी

ठळक मुद्देनऱ्हे रस्त्यावरील नवले शाळेच्या समोर वसंत दामू पवार यांच्या मालकीचे ओम ज्वेलर्स हे दुकान

धायरी: ओम ज्वेलर्स या सराफी दुकानात पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून सुमारे बारा किलो चांदी चोरून नेल्याची घटना धायरी येथे घडली आहे. 
नऱ्हे रस्त्यावरील नवले शाळेच्या समोर वसंत दामू पवार यांच्या मालकीचे ओम ज्वेलर्स हे दुकान आहे. सोमवारी रात्री ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते घरी गेले होते. पहाटे तीनच्या सुमारास इनोव्हा गाडीतून आलेल्या चोरट्यांनी दुकानाच्या समोर गाडी पार्क केली. त्यानंतर त्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी प्रथम दुकानात असणाऱ्या सीसीटिव्ही कॅमेरे वर स्प्रे मारून कॅमेरे बंद केले. त्यानंतर काऊंटरमधील असणारी सर्व चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले आहेत. अंदाजे १२ किलो चांदी असल्याचे समजते असून सराफ व्यवसाय काने सोने सुरक्षित ठिकाणी ठेवल्यामुळे ते चोरट्यांच्या हाती लागू शकले नाही. घटनास्थळी पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके आदींनी भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेगाने तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: The thieves robbry in a jewellery shop at dhayri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.