शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जैन साधूच्या वेशात चोरी करणारा चोरटा जेरबंद

By नितीश गोवंडे | Updated: December 9, 2024 17:08 IST

एका मंदिरात चोरी करताना, तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला अन् अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

पुणे : जैन साधकांसारखी वस्त्रे परिधान करून तो मंदिरात प्रवेश करत होता. पूजा-अर्चा केल्याचा बहाणा करून संधी मिळताच मंदिरातील किमती ऐवज चोरी करून निघून जायचा. मात्र, त्याचा हा बनाव स्वारगेट पोलिसांच्या नजरेत आला. अशाच एका मंदिरात चोरी करताना, तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला अन् अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.नरेश आगरचंद जैन (४८, बॉम्बे चाळ, टँक गिरगाव व्ही. पी. रोड, मुंबई) असे या चोरट्याचे नाव आहे. नरेश हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने यापूर्वी अशाच प्रकारे घाटकोपर, वाई, चिखली, डोंबिवली या परिसरात आठ ते दहा ठिकाणी मंदिरांमध्ये चोरी केल्याचे पुढे आले. पुण्यात देखील त्याने यापूर्वी मंदिरात चोऱ्या केल्या, मात्र तक्रार न आल्यामुळे त्याचा उलगडा झाला नाही. नरेश याच्याकडून चोरी केलेला देवाचा मुकुट, सोन्याची चैन, असा ४ लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.१५ नोव्हेंबर रोजी जय पारेख (रा. सिटीवूड सोसायटी, पुनावाला गार्डनसमोर) यांच्या घरातील जैन मंदिरात चोरी झाली होती. चोरट्याने जैन मंदिरातील सोन्याचा मुकुट आणि सोनसाखळी चोरी केली होती. याबाबत पारेख यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याचवेळी स्वारगेट परिसरातील तीन ते चार जैन मंदिरात देखील चोरीचा प्रयत्न झाला होता.७०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले अन् गुन्ह्याचा छडा लावला..चोरट्याकडून जैन मंदिरात चोऱ्या केल्या जात असल्यामुळे पोलिसांसमोर चोरट्याला पकडण्याचे आव्हान निर्माण झाले होते. त्यासाठी पोलिसांनी शहरातील तब्बल सातशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, खबऱ्यांचे नेटवर्क कामाला लावले. प्रत्येक शक्यता गृहीत धरून तपासाला सुरुवात केली. अखेर एका जैन मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये नरेशचा कारनामा कैद झाल्याचे दिसून आले. पांढरी वस्त्रे परिधान करून पूजा-अर्चा केल्यानंतर संधी मिळताच दागिने चोरी करताना तो दिसून आला. दरम्यान, पोलिस हवालदार सागर केकाण यांना नरेश मुंबई येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेतले.त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने आर्थिक अडचणीतून चोरी केल्याचे सांगितले. ही कामगिरी पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज नांद्रे, पोलिस उपनिरीक्षक संतोष तानवडे, पोलिस कर्मचारी शंकर संपते, कुंदन शिंदे, श्रीधर पाटील, दिनेश भांदुर्गे, रफीक नदाफ, सतीश कुंभार यांच्या पथकाने केली.

जैन मंदिरात जैन साधूच्या वेशात चोरी करणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. तो सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी देखील, असे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. स्वारगेट परिसरातील एका जैन मंदिरात त्याने चोरी केली होती. - युवराज नांद्रे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्वारगेट पोलिस ठाणे

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीJain Templeजैन मंदीरThiefचोरPoliceपोलिसcctvसीसीटीव्ही