बंद फ्लॅटवर चोरांचा डल्ला :खिडकीच्या काचा तोडून ऐवज लंपास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 16:36 IST2019-05-03T16:18:09+5:302019-05-03T16:36:21+5:30

खिडकीच्या काचा फोडून चोरट्यांनी बंद फ्लॅटवर डल्ला मारल्याचा प्रकार गंगा सवेरा बिल्डिंग जांभुळकर गार्डन शेजारी वानवडी या ठिकाणी घडला. यावेळी चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व 8 हजार 500 रुपयांची रोकड असा एक लाख 26 हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

Thieves on the closed flat: Break the window glass | बंद फ्लॅटवर चोरांचा डल्ला :खिडकीच्या काचा तोडून ऐवज लंपास 

बंद फ्लॅटवर चोरांचा डल्ला :खिडकीच्या काचा तोडून ऐवज लंपास 

पुणे:  खिडकीच्या काचा फोडून चोरट्यांनी बंद फ्लॅटवर डल्ला मारल्याचा प्रकार गंगा सवेरा बिल्डिंग जांभुळकर गार्डन शेजारी वानवडी या ठिकाणी घडला. यावेळी चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व 8 हजार 500 रुपयांची रोकड असा एक लाख 26 हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी जयंत आवटे (वय-60,रा.वानवडी) यांनी वानवडी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी आवटे  कामानिमित्ता सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास फ्लॅट बंद करून बाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी घराच्या खिडकीच्या काचा फोडून, आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बेडरूम मधील दोन्ही कपाटांचे लॉक उचकटून सोन्या-चांदीचे दागिणे व रोकड असा एक लाख 26 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला. जेव्हा फियार्दी हे घरी परत आले तेव्हा त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला त्यानुसार त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास उपनिरीक्षक गुर्जर करीत आहेत.

Web Title: Thieves on the closed flat: Break the window glass