राजगुरूनगर: राजगुरूनगर शहरात बंद फ्लॅचे दरवाजे तोडून चोरट्यांनी तब्बल ११ लाख २२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिनेचोरुन नेले आहेत. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात पोर्णिमा रोहन शहा ( रा. करंडे वस्ती रॉयल रेसीडेन्सी, राजगुरूनगर ता. खेड ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २८ ते ३० मार्च दरम्यान राजगुरूनगर येथील कंरडे वस्ती रॉयल रेसीडेन्सी मधील चोरटयांनी घराचे दरवाजाचे कडी कोयंडा तोडुन १० लाख ३५ हजाराचे सोन्या चांदिचे दागिने चोरून नेले. तसेच शेजारील फ्लॅट मधील प्रशांत अरुण जाधव व अनिल भागोजी अमराळे (रा. करंडे वस्ती, रॉयल रेसीडेन्सी ) यांच्याही बंद फ्लॅटचे ८७ हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने अज्ञात चोरटयांनी घराचे दरवाजाचे कडी कोयंडा तोडुन चोरुन नेले.