त्यांना त्यांची आणि भारताची ताकद माहिती आहे; ऑपरेशन सिंदूर कारवाईचे शरद पवारांकडून अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 10:19 IST2025-05-07T10:18:39+5:302025-05-07T10:19:21+5:30

अमेरिका, जपान आणि इतर देश यांनी भारताला समर्थन दिलं आहे, काळजी करण्यासारखी गोष्ट आहे की चीनने समर्थन दिलं नाही, भारताने सतर्क राहण्याची स्थिती आहे

They know their and India's strength Sharad Pawar congratulates them on Operation Sindoor | त्यांना त्यांची आणि भारताची ताकद माहिती आहे; ऑपरेशन सिंदूर कारवाईचे शरद पवारांकडून अभिनंदन

त्यांना त्यांची आणि भारताची ताकद माहिती आहे; ऑपरेशन सिंदूर कारवाईचे शरद पवारांकडून अभिनंदन

पुणे : भारताने दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करत मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. या हल्ल्याला ऑपरेशन सिंदुर असं नाव देण्यात आले. तिन्ही सैन्य दलाने मिळून ही संयुक्त कारवाई केली. भारताच्या धाडसी सैन्याने पाकिस्तानच्या ४ आणि पीओकेमध्ये ५ ठिकाणी एकाचवेळी टार्गेट केले. भारतीय गुप्तचर यंत्रणा RAW ने हे सर्व टार्गेट निश्चित केले होते. ज्यानंतर पूर्ण कारवाईने लश्कर आणि जैशच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. या कारवाईचे शरद पवार यांनी अभिनंदन केले आहे.  

शरद पवार म्हणाले, गेल्या आठवड्यात जे काही काश्मीर मध्ये घडले. त्यामुळे साहजिक देशात लोकांमध्ये एक अस्वस्थता होती. निष्पाप लोकांना गोळ्या घालतात. २७ लोकं मरण पावतात. भारत आणि पाकिस्तान यांमध्ये पी ओ के जो त्यांनी ४८ मध्ये घेतला तिथेच हे हल्ला करण्याचे स्थान केंद्रित केल्याचं दिसत आहे. पी ओ के मध्ये दहशतवादी यांचे कॅम्प आहेत, तिथे दारू गोळा ठेवला जातो आणि सगळी मदत पाकिस्तान करते. हिंदुस्थान आणि पाकिस्तान बॉर्डर ओलांडून आपण जाऊ इच्छित नव्हतो आणि त्याची काळजी भारतीय हवाई दलाने घेतली. पी ओ के मध्ये हल्ले झाले यात एक बदल दिसतो की, जे काश्मीरमधील घटना घडल्यानंतर संपूर्ण काश्मीर मध्ये स्थानिक जनता महाराष्ट्राच्या जनतेच्या सोबत उभी राहिली. काश्मीर मधील विधानसभेत हाताच्या विरोधात ठराव झाला, ओमर अब्दुल्ला यांनी स्वच्छ भूमिका दहशतवाद विरोधात केली. 

हा सगळा निर्णग योग्य घेतला आहे. सर्व पक्षीय बैठकीत सुप्रिया सुळे या उपस्थितीत होत्या. अशा परिस्थितीत राजकारण मध्ये न आणता आम्ही सोबत होतो. काल रात्री कारवाई झाली त्याच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. या हल्ल्याच्या नंतर अमेरिका, जपान आणि इतर देश यांनी भारताला समर्थन दिलं आहे. काळजी करण्यासारखी गोष्ट आहे की चीनने समर्थन दिलं नाही, भारताने सतर्क राहण्याची स्थिती आहे. पाकिस्तानला माहिती नाही. पण त्यांना त्यांची ताकद आणि भारताची ताकद माहिती आहे. या गोष्टीत आपल्याला सावध रहावं लागेल. पाकिस्तानची आर्थिक कोंडी कशी करता येईल हे धोरण चुकीचं नाही. या मोहिमेला नाव जे दिलं ते योग्य दिलं गेलं असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

Web Title: They know their and India's strength Sharad Pawar congratulates them on Operation Sindoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.