पक्ष फोडायला अन् सत्तेचे नंबर वाढवायला त्यांच्याकडे वेळ, पण... सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 12:18 PM2024-06-11T12:18:12+5:302024-06-11T12:18:25+5:30

Supriya Sule पुणेकर टॅक्स भरतात त्याचे पैसे जातात कुठं? पुणे तुंबण्याला पुणे महापलिका आणि प्रशासन जबाबदार

They have time to break the party and increase the number of power Supriya Sule's target on the government | पक्ष फोडायला अन् सत्तेचे नंबर वाढवायला त्यांच्याकडे वेळ, पण... सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा

पक्ष फोडायला अन् सत्तेचे नंबर वाढवायला त्यांच्याकडे वेळ, पण... सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा

पुणे : पुणे शहरात शनिवारी सायंकाळी आलेल्या जोरदार पावसाने सर्व जनजीवन विस्कळीत केले. अनेक घरांमध्ये, दुकानात पाणी शिरले. शहरातील रस्त्यांवर जणू नदी अवतरली होती. यात पुणेकरांचा दैना झाली. शहरात अवघ्या दोन तासांत झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने महापालिकेच्या कारभाराची पाेलखाेल केली. स्मार्ट सिटी पाण्यात बुडाली आणि यातच एका मुलीचा नाहक बळी गेला. हे सर्व घडूनही महापालिका प्रशासन स्वत:ची जबाबदारी झटकत निर्लज्जपणे पावसाकडे बाेट दाखवत आहे. शहरात पावसाळी उपाययोजना कमी पडली; पण ते मान्य न करता कमी वेळात मोठा पाऊस बरसल्याने यंत्रणा कमी पडली असे म्हणत महापालिका प्रशासनाने हात झटकली. हद्द म्हणजे, पुढील दोन तासात सर्व पाणी हटविण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केला आहे. 

शहराचा मागील काही वर्षांत झपाट्याने झालेला विस्तार, यात जागा बळकावण्याच्या हव्यासापोटी नैसर्गिक ओढे-नाल्यांवर केलेले अतिक्रमण, त्याकडे प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष, सिमेंट रस्त्याचे वाढलेले जाळे अन् तुंबलेली गटारे यासह विविध कारणांमुळे पुण्याची तुंबई झाली. स्मार्ट सिटीचे वाभाडे निघाले आणि ‘विकास’ पाण्यात वाहून गेला, अशा शब्दांत पुणेकर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शनिवारी  शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता, एरंडवणा, कोथरूड, कर्वेनगर, हडपसर, लोहगाव, धानोरी, सिंहगड रोड परिसर, वारजेसह शहराच्या विविध भागांत नागरिकांची तारांबळ उडवली होती. याभागात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेणे व पुणे महानगर पालिकेस त्यादृष्टीने उपाय योजना करण्यास सुचवण्यासाठी आज दौरा केला. यावेळी त्यांनी शनिवारी झालेल्या मुसळधार पावसासंदर्भांत नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.  

सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुणे शहरात गुन्हेगारी, ड्रुग्स इशू वाढतायेत. क्राईम रोज वाढत आहे. एका पावसात पुणेकरांची वाईट अवस्था झालीये. पुण्यात बाहेरून लोक राहायला येतात. नवरा बायको दोघे कमावून पुण्यात राहतात. शिक्षणासाठी पुण्याकडे देश अपेक्षेने बघतोय. असं एका पावसात पुण्याची अवस्था  बिकट झाल्याचे पाहून वाईट वाटते. सगळ्या घरांमध्ये पाणी साचतंय. पुणेकर टॅक्स भरतात त्याचे पैसे जातात कुठं? नाल्यांचा प्लॅनिंग, इमारतीला परवानगी PMC देत. मग या पुणे तुंबण्याला पुणे महापलिका (Pune Municipal Corporation) आणि प्रशासन जबाबदार आहे. त्यांचे ९८ नगरसेवक त्यांचे निवडून आले. केंद्रापर्यंत त्यांचंच सरकार आहे. आता ते  पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. सत्तेचे नंबर वाढवायला त्यांच्याकडे वेळ आहे. पण या नागरी समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अशा महाराष्ट्र सरकारकडून आता काय अपेक्षा करणार? सरकारच राजकारण मतांशी जोडलेल असतं. सत्ता हि जनतेच्या सेवेसाठी असते. पुण्याबद्दल सातत्याने नकारात्मक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. मी याबाबत आता आयुक्तांना भेटणार आहे. दिल्लीत तुम्ही कोणते मुद्दे मांडणार असं विचारले असता सुळे म्हणाल्या, राज्यात बेरोजगारी हा महत्वाचा मुद्दा आहे. पुण्यातून कंपन्या बाहेर चालल्या आहेत. हिंजवडीबाबत आम्ही मिटिंग घेणार आहोत. पवार साहेबांच्या आग्रहामुळे राजीव गांधी इफ्नोटेक पार्क स्थापन झाली. ६ लाख लोक काम करतात. जगाला दिशा दाखवण्याचं काम आपण केलं. हिंजवडीत पूर्ण देशातून मूल काम करतात. त्यांना असं बाहेर जाऊन देणार नाही.     

Web Title: They have time to break the party and increase the number of power Supriya Sule's target on the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.