Ashadhi Wari: पालखी मार्गावरील पुण्यातील 'हे' रस्ते बंद; पर्यायी मार्गांचा करा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 12:59 IST2023-06-10T12:52:30+5:302023-06-10T12:59:07+5:30

पहाटे २ वाजेपासून गरजेनुसार काही रस्ते बंद करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी कळविले आहे...

'These' roads in Pune on Palkhi Marg closed; Do adopt alternative routes | Ashadhi Wari: पालखी मार्गावरील पुण्यातील 'हे' रस्ते बंद; पर्यायी मार्गांचा करा वापर

Ashadhi Wari: पालखी मार्गावरील पुण्यातील 'हे' रस्ते बंद; पर्यायी मार्गांचा करा वापर

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी मार्गावरील रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, अशा सूचना पुणे वाहतूक शाखेतर्फे करण्यात आल्या आहेत. यात साेमवारी (दि. १२) पहाटे २ वाजेपासून गरजेनुसार काही रस्ते बंद करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी कळविले आहे.

संत तुकाराम महाराज पालखी बोपोडी चौकात पोहोचेपर्यंत...

वाहतुकीसाठी बंद असलेले रस्ते : पर्यायी मार्ग

- बोपोडी चौक ते खडकी बाजार : अंतर्गत रस्त्याने चर्च चौक

- चर्च चौक : भाऊ पाटील रोड - ब्रेमेन चौक - औंध मार्गे

- पोल्ट्री फार्म चौक : रेल्वे पोलिस मुख्यालयासमोरून औंध रोड - ब्रेमेन चौक

- मुळा रोड ते कमल नयन बजाज उद्यान चौक : अंतर्गत रस्त्याचा वापर करावा

पालखी इंजिनिअरिंग कॉलेज चौकात पोहोचेपर्यंत...

- जुना मुंबई-पुणे मार्गावरून पुण्याकडे येणारी सर्व प्रकारची वाहने बंद करण्यात येतील. बोपोडी चौकातून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी भाऊ पाटील रोडवरून औंध मार्गे ब्रेमेन चौकातून इच्छित स्थळी जावे.

- आरटीओ ते इंजिनिअरिंग कॉलेज चौक :

१) आरटीओ चौक : शाहीर अमर शेख चौक - कुंभार वेस चौक

२) आरटीओ चौक - जहांगीर चौक - आंबेडकर सेतू ते गुंजन मार्गे - सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट चौक - पर्णकुटी चौक - बंडगार्डन ब्रीज - महात्मा गांधी चौक मार्गे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आगमन दरम्यान बंद असलेले रस्ते व पर्यायी मार्ग...

वाहतुकीसाठी बंद असलेले रस्ते - पर्यायी मार्ग

- कळस फाटा ते बोपखेल फाटा / विश्रांतवाडी चौक : धानोरी रोडने व अंतर्गत रोडने

- मेंटल हॉस्पिटल कॉर्नर ते पाटील इस्टेट रोड : जेल रोड, विमानतळ रोड मार्गे

- सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट रोड : पर्णकुटी चौक - गुंजन चौक - जेल रोड - इंजिनिअरिंग चौक - विश्रांतवाडी चौक

- चंद्रमा चौक ते आळंदी रोड, नवीन आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक बंद, होळकर ब्रीज ते चंद्रमा चौक आणि होळकर ब्रीज ते साप्रस चोकी बंद - यासाठी अंतर्गत रस्त्यांचा वापर करावा.

Web Title: 'These' roads in Pune on Palkhi Marg closed; Do adopt alternative routes