शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

पुणे शहराचा चेहरा बदलणाऱ्या मेट्रोच्या जमिनीखाली २८ मीटरवर असणार ५ स्थानके

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 2:57 PM

मेट्रोचा बोगदा : १५० मीटर लांबी; २५ मीटर रुंदी; प्रथमच जमिनीत इतक्या खोल खोदाई 

ठळक मुद्देमेट्रोच्या वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट ३१ किलोमीटरचा मार्गकृषी महाविद्यालय ते स्वारगेट हा भाग पूर्ण भुयारी मार्ग

राजू इनामदार- पुणे : शहराचा चेहरा बदलणाऱ्या मेट्रोच्या ५ किलोमीटरच्या भुयारी बोगद्यात जमिनीच्या खाली २८ मीटर खोलीवर ५ स्थानके असतील. या दुमजली स्थानकांची लांबी १५० मीटरपेक्षा जास्त असून रुंदी २५ मीटर आहे. डिसेंबरअखेर बोगदा खोदण्याचे काम सुरू होणार असून ते पूर्ण होण्यास किमान २ वर्षे लागणार आहेत. पुण्यात प्रथमच इतक्या खोलवर सलगपणे इतके खोदकाम होत असून शहराच्या मध्यभागातून जाणारा बोगदा पुण्याची एक वेगळी ओळख देणारा ठरणार आहे. मेट्रोच्या वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या ३१ किलोमीटरच्या मार्गापैकी पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गातील कृषी महाविद्यालय ते स्वारगेट हा भाग पूर्ण भुयारी मार्ग आहे. जमिनीखाली २८ मीटर खोलीतून हा मार्ग जातो. त्यासाठी किमान ३० मीटर तरी खोदकाम करावे लागणार आहे. ५ किलोमीटर अंतराच्या सिमेंटच्या दोन मोठ्या ट्यूबच यातून जमिनीखाली तयार होणार असून त्यातून जाणारी व येणारी अशा दोन मेट्रो धावतील. त्याहीपेक्षा विशेष म्हणजे या ५ किलोमीटरच्या अंतरात जमिनीखालीच ५ मेट्रो स्थानके असतील. 

................ * शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, कसबा पेठ, मंडई व स्वारगेट अशी ५ स्थानके भुयारात असणार आहेत. ती सर्व दुमजली असतील. दोन बोगद्यांच्या मधल्या जागेत ही स्थानके असणार आहेत. 

* दोन्ही बाजूंनी त्यावर प्रवेश असेल. प्रत्येक स्थानकाची लांबी वेगवेगळी आहे. शिवाजीनगर व स्वारगेट ही स्थानके अनुक्रमे १७५ व १८० मीटर असतील. सिव्हिल कोर्ट, कसबा पेठ व मंडई ही तीन स्थानके प्रत्येकी १५० मीटर लांबीची आहेत. 

* सर्व स्थानकांची रुंदी २५ मीटर आहे. त्याचा पहिला मजला म्हणजे फलाट (प्लॅटफॉर्म) असेल. दुसºया मजल्यावर तिकीट विक्रीची व्यवस्था व प्रतीक्षा कक्ष वगैरे असेल. त्याच्या वर आले की प्रवासी थेट जमिनीवर येतील व रस्त्यावरच्या गर्दीत मिसळून जातील.

* अशी असतील भुयारी स्थानकेस्थानकाच्या खालील मजल्यावरून म्हणजे फलाटावरून जमिनीवर येण्यासाठी पायऱ्या, सरकते जिने व लिफ्ट अशा सुविधा असतील. ही स्थानकेही उन्नत मार्गावरील स्थानकांप्रमाणेच वैशिष्ट्यपूर्ण रचनेची, अत्याधुनिक बांधकामाची व सगळ्या आवश्यक सेवासुविधा असलेली असतील. प्रवासी जमिनीवर येतील त्या ठिकाणी किमान १५ ते २० मीटर रुंदीची जागा असेल. पाचही ठिकाणी अशी जागा निश्चित करण्यात आली आहे. शिवाजीनगरला एसटी स्थानकाच्या जागेत, सिव्हिल कोर्टजवळ, मंडईत झुणका भाकर केंद्राच्या जागेवर कामही सुरू करण्यात आले आहे.    कसबा पेठेतील फडके हौदाजवळ जागा मिळण्यात काही अडचणी येत होत्या, त्यामुळे महामेट्रो कंपनीने ती जागाच बदलून त्यामागे असणाºया महापालिकेच्या दादोजी कोंडदेव या शाळेची जागा पालिकेकडून मिळवली आहे. तिथे कामही सुरू करण्यात आले असून कृषी महाविद्यालय व स्वारगेट या दोन्ही बाजूंना खोदकाम करणारे यंत्र (टीबीएम-टनेल बोअरिंग मशिन) जमिनीत सोडण्यासाठी म्हणून मोठा शाफ्ट (उतार) तयार करण्यात आला आहे. अशी चार यंत्र आहेत, त्यातील पहिले यंत्र येत्या काही दिवसांत पुण्यात सुट्या भागांच्या स्वरूपात दाखल होईल. ते जोडून डिसेंबरअखेर खोदकामाला प्रत्यक्ष सुरूवात करण्यात येणार आहे. रोज साधारण ८ मीटर खोदकाम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भुयाराचे काम सुरू झाल्यापासून ते पुर्ण होण्यास किमान दोन वर्षांचा अवधी लागणार आहे. तोपर्यंत मेट्रोच्या उन्नत मार्गाचे काम पुर्ण होऊन ती दोन्ही बाजूंनी भूयारापर्यंत सुरूही करण्यात येईल. ......

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रो