शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाबाबत गर्भवतींमध्ये अजूनही संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST

पुणे : मागील आठवड्यापासून गर्भवतींच्या लसीकरणाला सुरुवात झाली. राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार गट आणि कोरोना लसीकरणासाठी असलेल्या ‘राष्ट्रीय तज्ज्ञ ...

पुणे : मागील आठवड्यापासून गर्भवतींच्या लसीकरणाला सुरुवात झाली. राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार गट आणि कोरोना लसीकरणासाठी असलेल्या ‘राष्ट्रीय तज्ज्ञ गटा’च्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने गरोदर महिलांना ‘कोविड-१९’ लसीकरणात समाविष्ट केले आहे. लसीकरणाबाबत गर्भवतींमध्ये अजूनही काहीसा संभ्रम पाहायला मिळत आहे. पुणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ४३ गर्भवतींचे, तर औंध जिल्हा रुग्णालयात ७ गर्भवतींचे लसीकरण झाले आहे.

इतरांच्या तुलनेत गर्भवतींना कोरोनाचा जास्त धोका असल्याचे आजवरच्या अभ्यासातून सिद्ध झाले आहे. गर्भावस्थेत रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेली असते, त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते. कोरोनाची संसर्ग तीव्र असल्यास अर्भकावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गर्भवतींनी लस घेण्याचा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञांकडून दिला जात आहे. मात्र, गर्भावस्था हा आयुष्यातील अत्यंत नाजूक टप्पा असल्याने लसीचा विपरित परिणाम होणार नाही ना, या भीतीने गर्भवती महिला संभ्रमावस्थेत असल्याचे दिसत आहे.

गर्भवस्थेच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये उलटी, मळमळ, चक्कर येणे अशी लक्षणे गर्भवती महिलांमध्ये दिसतात. या काळात अशक्तपणाही आलेला असतो, बरेचदा भूक लागत नाही. तब्येतीच्या तक्रारींमुळे आधीच जीव घाबरा झालेला असतो, त्यातून लस घेतल्यानंतर ताप, अंगदुखी अशा त्रासाची भर पडू नये, अशी भीती गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये दिसून येत आहे. स्त्रीरोगतज्ज्ञांशी बोलून गर्भवतींनी आपल्या सर्व शंकांचे निरसन करून घ्यावे आणि लसीचा थोडा त्रास झाल्यास काय करावे, याबाबतही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मात्र लस घेण्याबाबत विनाकारण गैरसमज बाळगू नयेत, असे आवाहन केले जात आहे.

--------------------

गर्भवतींचे लसीकरण

पुणे मनपा : ४३

औंध जिल्हा रुग्णालय : ७

-----------------------

मला सध्या चौथा महिना सुरू आहे. लग्नाला पाच वर्षे झाली. दोन वर्षांपूर्वी गर्भपात झाला होता. त्यामुळे आता गर्भधारणा झाल्यापासून खूप जपावे लागते. लस घेतल्यावर मला आणि बाळाला काही त्रास होणार नाही ना, अशी भीती वाटते. माझ्या डॉक्टरांनी लस घेणे सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. मात्र, मी स्वत: आणि कुटुंबातील सदस्यही अद्याप माझ्या लसीकरणाबाबत निश्चित निर्णय घेऊ शकलेलो नाही.

- अनिता बिनिवाले, गर्भवती महिला

-----------------------

गर्भावस्थेच्या पहिल्या महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंत लस घेता येऊ शकते. कोरोनाची लागण झाल्यास निर्माण होणा-या धोक्यांबाबत महिलांचे समुपदेशन केले जाते. लसीकरणाआधी हाय रिस्क फॅक्टर किंवा सहव्याधी आदींची माहिती घेतली जाते. गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाली असेल तर कोरोनामुक्त झाल्यावर तीन महिन्यांनी किंवा प्रसुतीनंतर लसीकरण होऊ शकते. लसीकरणानंतर सौम्य ताप, डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा अशी लक्षणे दिसल्यास योग्य औषधोपचार डॉक्टरांकडून सुचवले जातात.

- डॉ. नीलम दीक्षित, प्रसुती विभागप्रमुख, औंध जिल्हा रुग्णालय