शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

शेतीला अावश्यक तेवढा पाऊस नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 5:22 PM

मॉन्सूनच्या मुख्य चार महिन्यांपैकी साडेतीन महिने सरत असले असून राज्यातील अनेक भागात शेतीला आवश्यक तेवढा पाऊस झालेला नाही़.

पुणे : मॉन्सूनच्या मुख्य चार महिन्यांपैकी साडेतीन महिने सरत असले असून राज्यातील अनेक भागात शेतीला आवश्यक तेवढा पाऊस झालेला नाही़. १० जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. १८ सप्टेंबरपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता नाही़. त्याचदरम्यान मॉन्सूनच्या परतीला सुरुवात होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे आता परतीच्या पावसावरच प्रामुख्याने आशा केंद्रीत झाल्या आहेत. 

    गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात पावसाने ओढ दिली आहे. कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या तीनही विभागात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडला आहे. याशिवाय अहमदनगर (-१३), धुळे व जळगाव (-१७), परभणी (-१५), यवतमाळ (-१३) टक्के पाऊस कमी झाला आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २८ टक्के जादा पाऊस झाला असून ठाणे ११ टक्के, नांदेड ९ टक्के जादा पावसाची नोंद झाली आहे. ईशान्य भारतातील काही राज्यांचा अपवाद वगळता सध्या संपूर्ण भारतात मॉन्सून थबकलेला आहे. अरबी समुद्र तसेच पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार न झाल्याने देशभरात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे.  महाराष्ट्रासारखीच अनेक राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. रायलसीमा भागात सरासरापेक्षा तब्बल ४६ टक्के पाऊस कमी झाला आहे.

    पुढील चार दिवस मॉन्सूनची स्थिती अशीच राहण्याची शक्यता असून १८ सप्टेंबर दरम्यान पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे मध्य भारतात काही प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता असून त्याचा फायदा राज्यातील काही जिल्ह्यांना होण्याची शक्यता आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेले जिल्हे (टक्के) सोलापूर (- ३१), सांगली (-३०), नंदूरबार (- २९), औरंगाबाद (-२५), बुलढाणा व वर्धा (- २४), लातूर (-२३), अमरावती व बीड (- २२), जालना (-२१)

१ जून ते १२ सप्टेंबर पर्यंत पडलेला पाऊस( मिमी) विभाग        प्रत्यक्ष        सरासरी        फरककोकण        २८२५़१        २७४२        ३मध्य महाराष्ट्र    ६२७़८        ६३४        -१मराठवाडा        ५१०़२        ५८९        -१३विदर्भ        ८२०़३        ८७५        -६ 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसFarmerशेतकरीWaterपाणी