शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात मनसे फॅक्टर चाललाच नाही

By admin | Updated: October 19, 2014 22:34 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यात आपले नगरसेवक विधानसभेच्या निवडणुकीत उतरवून चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र मनसेचा फॅक्टर पुण्यात चाललाच नाही.

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यात आपले नगरसेवक विधानसभेच्या निवडणुकीत उतरवून चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र मनसेचा फॅक्टर पुण्यात चाललाच नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे किशोर शिंदे यांनी कोथरूडमधून, तर कसब्यातून रवींद्र धंगेकर यांनी जोरदार लढत देऊन दुसऱ्या क्रमाकांची मते मिळविली होती. खडकवासल्यातून रमेश वांजळे हे निवडून आले होते. या वेळी मनसेचे तिन्ही उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. पंचरंगी लढतीत मनसेचे गठ्ठा मतदान निकाल फिरवेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, मनसेची लाट आलीच नाही. राज ठाकरे यांनी पुण्यात एकमेव सभा घेतली होती; परंतु त्यानंतरही वातावरण तयार झाले नाही. मनसेमध्ये इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे एकमेकांच्या विरोधात काम करण्याचे प्रकारही घडल्याची चर्चा आहे. युती ऐन वेळी तुटल्याने भाजपाकडे उमेदवार तयार नव्हते; मात्र ऐन वेळी उमेदवारी दिलेल्यांना पक्षाकडून मोठी ताकद देण्यात आली. इतर पक्ष यामध्येच प्रामुख्याने कमी पडले. शिवसेनेचे कार्यकर्ते प्रचारात उतरले; मात्र त्यांच्याकडे फारसे मुद्दे नव्हते. राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभाही होऊ शकल्या नाहीत.राष्ट्रवादी कॉँग्रेसने कसब्यातून ऐन वेळी दीपक मानकर यांना उमेदवारी दिली; मात्र पक्षाची मते त्यांच्याकडे फिरू शकली नाहीत. इतर ठिकाणी राष्ट्रवादी कॉँग्रेस गांभीर्याने लढलीच नाही, असे चित्र होते. अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडवरच लक्ष केंद्रित केले होते. पुण्यात त्यांनी बैठकाही घेतल्या नाहीत.