शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

विभागलेले महापुरुष एकत्र करण्याची गरज

By admin | Updated: January 25, 2017 02:13 IST

सर्व महापुरुषांचे सामर्थ्य त्यांच्या जातीपुरतेच संकुचित केले गेले आहे. विभागलेले महापुरुष एकत्र करण्याची आता गरज निर्माण

पुणे : सर्व महापुरुषांचे सामर्थ्य त्यांच्या जातीपुरतेच संकुचित केले गेले आहे. विभागलेले महापुरुष एकत्र करण्याची आता गरज निर्माण झाली आहे, असे मत ८९व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. ‘अग्निपंख’ आयोजित दुसऱ्या युवा मराठी साहित्य संमेलनाचा समारोप सोमवारी झाला. त्या वेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, संमेलनाचे अध्यक्ष वीरा राठोड, माजी आमदार उल्हास पवार, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी, सचिन इटकर, प्रकाश पवार, सचिन सानप, कृष्णा काजळे, ज्ञानेश्वर मोडक, संकेत पडवळ, हनुमंत पवार उपस्थित होते.सबनीस म्हणाले, ‘‘सांस्कृतिक आव्हान पेलण्यासाठी तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे. आज भटक्या विमुक्त समाजातील तरुण या संमेलनाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर फक्त जानव्यात, आळंदीत किंवा पुण्यात जन्मला येतो, असे नसून भटक्या तांड्यातही तो जन्म घेत आहे.’’युवकांची, परिवर्तनाची देशाला सातत्याने गरज असून, त्यासाठी साहित्य हे महत्त्वाचे माध्यम आहे. सोशल मीडियासारख्या माध्यमांचा वापर विचार परिपक्व करण्याच्या दृष्टीने तरुणांनी करायला हवा. या माध्यमांमधील विकृतींपासून दूर राहायला हवे. आपल्यासमोर धार्मिक विकृतीला बळी पडणाऱ्या तरुणाईला वाचवण्याचे मोठे आव्हान आहे. भाकरीपासून ते लग्नापर्यंतचे तरुणांचे प्रश्न विवेकाने सोडवणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.भाई वैद्य म्हणाले, ‘‘देशात सध्या स्वातंत्र्य चळवळीपेक्षा बिकट आव्हान तरुणांसमोर आहे. त्या आव्हानांना तोंड देताना परिणामी स्वकीयांच्याही विरोधात जाण्याची तयारी तरुणांनी ठेवायला हवी. तरुण भविष्याची आशा आहेत. मात्र, या देशात भविष्य कशा प्रकारचे घडणार आहे याचा प्रश्न पडला आहे. धर्मनिष्ठ राष्ट्र निर्माण करत असताना जे जन्मत: बंडखोर असतात अशा तरुणांना धाकात ठेवण्याचा प्रयत्न सध्या होत आहेत. (प्रतिनिधी)