शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयच्या विद्यार्थिनीस लुटणारा सराईत चोरटा जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 21:14 IST

चहा पिण्यासाठी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चहा पिण्यासाठी संस्थेतून बाहेर पडले होते एफटीआयआयची ३१ वर्षाची विद्यार्थिनी आणि तिचा सहकारी...

ठळक मुद्दे८०० रुपये, मोबाईल, इतर कागदपत्रे असा ९ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास

पुणे : राष्ट्रीय दूरचित्रवाणी आणि चित्रपट निर्मिती संस्थेतील (एफटीआयआय) विद्यार्थिनीला शस्राचा धाक दाखवून तिचा मोबाईल व रोकड जबरदस्तीने चोरुन नेणाऱ्यास पकडण्यात दीड महिन्यानंतर पोलिसांना यश आले आहे.उबेद सलीम शेख (वय २५, रा़ कसबा पेठ) असे या सराईताचे नाव आहे. ही घटना लॉ कॉलेज रोडवरील कॅफे कॉफी डेसमोर २५ नोव्हेंबरच्या पहाटे ३ वाजता घडली होती. गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यास तसेच उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांबाबत माहिती काढून शोध घेण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकांना सूचना देण्यात आल्या आहेत. डेक्कन पोलीस ठाण्यातील दाखल जबरी चोरीचा तपास लागला नव्हता. पोलीस उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे व त्यांचे सहकारी तपास करीत असताना उबेद शेख हा चोरीला गेलेला मोबर्इाल वापरत असल्याचे आढळून आले. तो मंगळवार पेठेतील श्रीकृष्ण मित्र मंडळाजवळ आला असल्याची माहिती मिळाली. पोलीस तेथे गेला असताना तो मंडळाजवळ बसलेला दिसला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक मोबाईल सापडला़ चौकशी केली असताना आपण साथीदारांसह लॉ कॉलेज रोडवरुन हा मोबाईल चोरला असल्याचे सांगितले. एफटीआयआयची ३१ वर्षाची विद्यार्थिनी आणि तिचा सहकारी २५ नोव्हेंबर २०१९ रोजी मध्यरात्री संस्थेत चित्रीकरण करत होते. त्यानंतर ते पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चहा पिण्यासाठी संस्थेतून बाहेर पडले. विधी महाविद्यालय रस्त्यावरील कॅफे कॉफी डे समोर दुचाकीवरुन आलेल्या तीन चोरट्यांनी दोघांना अडविले. कोयत्याचा धाक दाखवून तिच्याकडील ८०० रुपये, मोबाईल, इतर कागदपत्रे असा ९ हजार ६०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर चोरटे दुचाकीवरुन नळस्टॉप चौकाच्या दिशेने पळून गेले होते. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिसFTIIएफटीआयआय